स्वपक्षीय नगर सेवकांच्या प्रश्नामूळे शेवटी सभा तहकुब झाली
मूल :( अभि भिमणवार )
नगराध्यक्षांनी बोलाविलेली सर्वसाधारण सभेवर भाजपाच्या काही नगरसेवकांनी बहिष्कार टाकुन सभा तहकुब करण्यास भाग पाडल्याची घटना मूल नगर परिषदेत घडली.
महत्वाच्या तीस विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी आज नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बोलाविली होती. सतरा सदस्यीय नगर परिषदेत सभेला सतरा सदस्य उपस्थित होते. नियोजीत वेळेनुसार सभेला सुरूवात होताच भाजपाच्या काही सदस्यांनी मागील सभेत नगरसेवकांनी सुचविलेले काम सर्वानुमते मंजूर झाल्यानंतरही ते काम होत नाही. असे म्हणत नगर परिषदेत सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना देय असलेली रक्कम कां दिल्या गेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात मुख्याधिका-यासह नगराध्यक्ष यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या उत्तरावर उपस्थित काही नगरसेवकांचे समाधान झाले नाही, नगरसेवक महेंद्र करकाडे यांचे संदर्भात घडलेल्या प्रकरणात नगराध्यक्ष यांनी समन्वय साधावा, म्हणून काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष भोयर यांना विनंती केली, परंतू नगराध्यक्ष यांनी सदर प्रकरणात दुर्लक्ष केले. त्यामूळे नगर सेवक करकाडे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. असे म्हणत भाजपाच्या महेंद्र करकाडे, प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे आणि विनोद सिडाम या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. भाजपाच्या पाच नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकल्यानंतर इतर नगरसेवकांनीही सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे शेवटी नगराध्यक्ष भोयर सभा तहकुब करावी लागली. यासंदर्भात नगराध्यक्ष भोयर यांचशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीच्या सततच्या व्यस्ततेमूळे संपर्क होवू शकला नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!