धान पिकावर मावा तुडतुडा रोगाचा प्रकोप; कृषी विभाग अनभिज्ञ!
धान पिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप!
मूल (प्रकाश चलाख)
ूमुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जात असून पीक अंतिम टप्प्यात आहे. धान पिकावर गेल्या काही दिवसापासून मावा तुडतु डा रोगाचा प्रकोप झाला असल्याने धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
विदर्भात मुल तालुका धान उत्पादक तालुका म्हणून परिचित असून येथील तांदळाला बाहेर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इथे उत्पादित झालेला तांदूळ बाहेर निर्यात केला जात असून येथील तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करीत असून हंगामात खरीप व रब्बी दोन्ही पिके घेत असतो.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा या रोगाने कहर केला असून ऐन हंगामातच या रोगाने धान पिकाला ग्रस्त केल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात फवारणी करीत आहे. ही सर्व रासायनिक औषधे कृषी केंद्रातून शेतकरी खरेदी करीत असून महागडी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हे रासायनिक कीटकनाशके परवडणारे नसल्याने कंबरडे मोडले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला असताना कृषी विभाग अनभिज्ञ असून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना संबंधित विभागामार्फत कुठलेही मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आहे.
कृषी सेवक महत्त्वाचा दुवा.
"कृषी विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी कृषी सेवक हा कृषी विभाग व शेतकरी यांचा महत्त्वाचा दुवा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणे; विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे हे कृषी सेवकाचे आद्य कर्तव्य आहे. परंतु काही परिसरातील कृषी सेवक हे शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असून वरिष्ठांनी यात दखल घेण्याची नितांत गरज आहे."
कृषी विभागांतर्गत काही निवडक शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशके मिळत असतांना वाटप प्रक्रियेत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांप्रति भेदभाव करीत असून सावळागोंधळ निर्माण करीत आहेत. या प्रक्रियेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज असल्याचे मत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!