मुल येथे मुक मार्च काढत हाथरस घटनेचा निषेध...
तालुका प्रतिनिधी:
सचिन वाकडे, (मुल)
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हयातील भुलगडी येथील एकोणवीस वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात मुल येथे आम आदमी पार्टीकडून तोंडाला काळी पटटी बांधून निषेध करीत मध्यवर्ती गांधी चैक ते प्रशासकिय भवनपर्यंत मुक मार्च काढण्यात आला.
देशाला हादरवून टाकणाऱ्या तसेच अमानवीय कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी दया, त्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करा, योगी मोदी राजीनामा दया असे फलक घेवून युवतींनी घटनेचा निषेध केला. मूक मार्च प्रशासकिय भवन जवळ पोहोचताच महिला व उपस्थितांनी पिडीतेच्या प्रतिमेसमोर मोमबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली.
निर्भया प्रकरणानंतर कठोर कायदे करुनही देशभरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये कमी झालेली नसून हि विकृत मानसिकता अधूनमधून आपले डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. अश्या घटनेत अत्याचार झाल्यावरही उशीरा तक्रार नोंदवून घेणे, तात्काळ वैद्यकिय उपचार न मिळणे, परीवाराकडून रीतसर अंत्यसंस्काराचा हक्क हिरावणे, प्रशासन व पोलीसांकडून दबावतंत्राचा वापर करणे हे माणुसकिला काळीमा फासणारे कृत्य आहे. सर्वांना समान न्याय मिळावा त्यात भेदभाव नसावा असे वक्तव्य जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी केले.
अमानुषतेचा कळस गाठणाऱ्या तसेच बेटी बचावचा नारा देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये राष्टपती राजवट लागु करण्यात यावी, आरोपींना फाशी देण्यात यावी, महिला अत्याचार थांबविण्यात पुर्णपणे अपयशी झालेल्या केंद्रिय गुहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या त्वरीत राजीनामा घेण्यात यावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जावून तातडिने न्यायालयीन कार्यवाही पुर्ण करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी, सिबीआय तपास सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधिश यांचे देखरेखीखाली करण्यात येवून पिडीतेला त्वरीत न्याय देण्यात यावा आदी मागण्यांसह आम आदमी पार्टीकडुन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. पारोमिता गोस्वामी, तालुका महिला अध्यक्ष कुमुदिनी भोयर, आचल भोयर, काजल सुरपाम, दामिनी भोया, सोनी गेडाम, प्रिया चैधरी, जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, तालुका अध्यक्ष अमित राउत, दिनेश देशमुख तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!