चंद्रपुर महिला कांग्रेस कमेटी तर्फे चंद्रपुर व बल्लारपुर तालुका अध्यक्ष पदी शबाना शेख यांची नियुक्ती

महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये आनंदाचे वातावरण

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - दिनांक.०५/१०/२०२० चंद्रपुर महिला कांग्रेस कमेटी तर्फे चंद्रपुर व बल्लारपुर तालुका अध्यक्ष पदी शबाना शेख यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या ऍड.सौ.मनिषा चंद्रकांत रोटे ( माई ) यांच्या माध्यमातून नियुक्ति करण्यात आली.शबाना शेख यांच्या नियुक्तीने महिला काँग्रेस कायकर्त्यांमध्ये आनंद व जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या पदी नियुक्ती केली असता.अध्यक्ष पदाचे काम सक्षमपणे कराल असा विश्वास व्यक्त करून हि जवाबदारी सोपविली आणि योग्य रितीने या पदाचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढविण्यासाठी व असंघटीत महिला विभागाचे जाळे जास्तीत जास्त प्रमाणात विस्तारीत कराल आणि पदाची विचारधारा आणि धोरणे सातत्यपूर्ण स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाल अशी अपेक्षा ठेऊन पुढील वाटचालीसाठी पक्षश्रेष्ठींनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जि.प. सदस्य ममता डुकरे, शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल,रामु तिवारी तथा अन्य कांग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिति होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!