हाथरस येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी बहुजनमहासंघ तथा वंचितबहुजन आघाडीच्या वतीने लाखांदुर तहसिलदार मार्फत राष्ट्रपतीना दिले निवेदन

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - देशामध्ये सतत बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दि. १४/०९/२०२० ला कु.मनिषा वाल्मिकी (१९) वर्षे या मुलीवर हाथरस, ऊत्तर प्रदेश येथे चार नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. तिची जिभ कापण्यात आली, मानेचे हाड तोडण्यात आले. इतकं घडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. उपचार सुरू असताना दि ३०/०९/२०२० ला तिने अखेरचा श्वास घेतला. 
या घटनेमध्ये इतकं वाईट कृत्य घडलं कि आजपर्यंत आपल्या देशामध्ये ईतकी दुर्दैवी घटना घडली नाही. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात कि, "बेटी पढाओ, बेटी बचाओ" हे वाक्य फक्त आणि फक्त मोदीजी उच्चारत असतात. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही.या देशातील स्त्री खरोखर स्वतंत्र आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. देशात अन्याय, अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करीत आहे.बल्लारपूर, ऊत्तर प्रदेश येथे मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध करून सदर आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणी करीता तहसीलदार साहेब लाखांदुर यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदय यांना वंचित बहुजन आघाडी लाखांदुर यांचे वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष युवराजभाऊ सुखदेवे, अजय रामटेके, महादेव सुखदेवे, मोदकराज रामटेके, प्रकाश सुखदेवे, आनंदराव लोखंडे, शिलमंजू सिंहगडे प्रचार प्रमुख भंडारा जिल्हा, खुशाल बोरकर, एस. एम. खंगार अध्यक्ष भंडारा जिल्हा, डि. आर. रामटेके महासचिव भंडारा जिल्हा, विजय शहारे, अरविंद गोस्वामी उपाध्यक्ष भंडारा जिल्हा, विक्की कोल्हे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!