भंडारा जिल्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण

शरद ईटवले यांनी मांढल्या ददुग्ध ऊत्पादकांच्या व्यथा
       
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - भंडारा जिल्ह्यात कृषी व्यवसायाबरोबरच दुधाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केला जातो.निसर्गाचा प्रकोप कृषी व्यवसायावर आल्यानंतर शेतकऱ्यांना   पर्यायी मार्ग म्हणजे दूध व्यवसाय आहे.आणि ह्या दूध व्यवसायावर जर भंडारा जील्हात कृतीम संकट येत असेल तर,यास जबाबदार कोण ?
      ज्यांना आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून खुर्चीवर बसावतो असे रक्षकच भक्षक निघाले तर काय होणार? आणि आज ही वेळ आपल्या भंडारा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्यावर आली आहे.
   महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनासाठी जो जिल्हा ओळखला जातो.ज्या जिल्ह्यातील दूध संघाचा नाव महाराष्ट्रात प्रसिध्दी स येतो. असा आमचा जिल्ह्यातील "भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ" आज अस्या लाजिरवाणा अवस्थेत पोहचला की सांगता येत नाही.ऐवडी बिकट अवस्था आली आहे ,की आज दूध उत्पादकांचे दीड वर्षापासून दुधाचे पेमेंट देवू शकत नाही.मग शेतकऱ्यांनी आपला कुटुंबाचा प्रपंच कसा करावा? आणि शेतकऱ्यांनी न्याय कुणास मागावी.
  संघात काम करणारे कर्मचारी कमी पगार असून सुद्धा काम करत आहेत .आणि त्यांचा ५ महिन्याचा पगार अजून मिळालेला नाही .त्यांनी काय करावे, घराचा किराया कसे द्यावे,मुलांचे शिक्षण कसे करावे, आणि पोट कसा भरावा ?याची कधी कोणी विचारणा केली का ?
        आज भंडारा जिल्हा दूध संघ डबघाईस आल्याने जिल्ह्यातील शेतकरी सोबत कर्मचारी वर्गाचीही दयनीय अवस्था झाली आले.आज हजारो लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न निव्वळ दूध संघ डबघाईस आल्याने वाऱ्यावर आले आहे.यांची कुणाला द्या येत नाही का?
        ज्या शेतकऱ्यांचा नावाने राजकारण केले जाते,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,शेतकऱ्यांचा प्रस्न सोडविण्याचे काम आमचे आहे, असे सांगून मत मागले जातात आणि खुर्चीवर बसतात. बस तेवड्या पुरतेच का? 
     आज शेतकऱ्यांची ऐवडि दयनीय अवस्था झाली असून सुद्धा कुटल्याही पक्षचा राजकारणी नेत्याला पाझर का फुटत नाही, द्या का येत नाही, माझा शेतकरी म्हणणारे आज गेले कुठे ?
आज जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचा नेते मंडळींना याबत निवेदन देण्यात आले , परंतु होते काय तेच समजत नाही,. पुन्हा निवडणूक आली की माझा शेतकरी फक्त,,!
      साहेब राजकारण सोडून थोडे बाहेर जावून बघा, शेतकऱ्यांचे प्रस्न सोडवून त्यांचे अश्रू पुसून बघा ,त्यावेळी कळेल की शेतकऱ्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलं.
नुसता शेतकर्यांचा नावाने राजकारण करून ,शेतकऱ्यांना दूलक्ष ,शेतकऱ्यांचा टाळूवरचे लोणी खावून काय साध्य करणार आहात?
कुठे भराल ऐवडा पाप, थोडा वेळ विचार करून बघा ,की आपण खरंच शेतकऱ्यासाठी काय करतो,आणि आजपर्यंत नाही केलं आणि जर आता शेतकऱ्यासाठी काही तरी केलं तर काय होईल? 
      शेतकऱ्यांचे चांगलं केलं तर तुम्हाला देव मानतील.
        भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अश्रू पुसनारा कोणी नेता असेल तर मग तो कुठल्याही पक्षाचा असेल यात कुटलही राजकारण न करता  त्यांनी पुढे यावे.की मी शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतो.
       अन्यथा आम्ही समजू शकतो की शेतकऱ्यांचा भंडारा जिल्ह्यात कोणीही मायबाप नाही.
      दूध उत्पादक   शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही.ही आम्हा  जिल्हा तील जनते साठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

शरद इट वाले
भंडारा जी.प्रा.दूध संघटना
सचिव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!