प्रभाव लोकमतचा

अखेर विधवा महिलेस करुण दिली नवीन वीज मीटरची जोडणी

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - पळसगांव (पिपर्डा)कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले असतानाच या कठिण काळातही महावितरणने पाठविलेल्या वीज बिलामुळे गोंधळ उडाला असतांनाच चिमूर तालुक्‍यातील पळसगांव (पिपर्डा) येथील एका विधवा व मोडक्या घरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल 65 हजार 520 रुपये इतके बिल महावितरनाने पाठविले वाढीव वीज बिलांचा गरीब महिलेला शॉक दिला होता.  या बाबत प्रथम लोकमत मध्ये वृत्त प्रसारित होताच महावितरण विभागणी याची तात्काळ दखल घेत सदर विधवा महिलेच्या घरी महावितरण चे खिरटकर नामक कर्मचारी यांनी नवीन मीटरची जोडणी करून दिले आहे.सदर महिलेस वेळीच न्याय मिळाला आहे त्या मुळे महिलेच्या चेहऱ्यावर तात्पुरता दिलासा मिळाला आहे.सदर महिलेणी लोकमत चे आभार मानले आहे.
सदर मीटर ची पडताळणी करण्याकरिता मिटर  तात्पुरता काढले असून नवीन मीटरची जोडणी करून दिली आहे.

    ओ.अ. मुकादम
    कनिष्ठ अभियंता            
    महावितरण,चिमूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!