गोंडवाना विद्यापीठातील लेखणीबंद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र स्टूडेंट युनियन चंद्रपूर कड़ून शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले निवेदन
वरोरा तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - दिनांक २५ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनामुळे अंतिम वर्षांच्या सर्व शाखेचे परीक्षा येत्या ५ ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे आणि कर्मचाऱ्यांचे होत असलेल्या संप आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कारण सहाजिकच त्या आंदोलनामुळे फार मोठा विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तरी ही सर्व बाब विद्यार्थ्यांची लक्षात घेऊन. मासू कडून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत सरांना मेलद्वारे निवेदन देण्यात आले व त्वरित तोडगा काढून शिक्षण हित निर्णय घ्यावा ही विनंती केली.
तरी उपस्थित महाराष्ट्र स्टूडेंट युनियन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- चेतन वासाडे, उपजिल्हाध्यक्ष खिलेश धोटे, जिल्हा सचिव नितेश ताजने,जिल्हा कोषाध्यक्ष मुकेश बोंडे तालुकाध्यक्ष संकेत केळझरकर, कार्याध्यक्ष अभी वांढरे, पुष्पक बोबडे, गितेश राऊत ,वैभव काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!