पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता प्रकाश नाकतोडे यांची पुर्व महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष पदी निवड

प्रकाश देशमुख ता.अध्यक्ष दौंड यांच्या शिफारशी वरुन आजिनाथ जाधव संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी केली निवड

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - भंडारा जिल्हयातील लाखांदुर तालुक्यातील सामाजीक कार्यकरता व पत्रकार प्रकाश नाकतोडे यांची पुर्व महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत असे कि, प्रकाश नाकतोडे हे मागील वीस वर्षा पासुन सामाजीक कार्या मध्ये यांचा सक्रीय सहभाग असुन त्यांनी समाजातील संपुर्ण घटकासाठी काम केले आहे.आणि करित आहेत. प्रकाश नाकतोडे यांनी अन्यायाला वाचा फोडुन  लोकांच्या समस्या सोडुवुन तळागाळातील लोकांना न्याय मिळवुन दिला आहे. याचीच दखल घेऊन माहित अधिकार कार्यकरता समिती प्रदेश अध्यक्ष साईनाथ शिंदे  महाराष्ट्रराज्य व प्रकाश देशमुख ता.अध्यक्ष दौंड तालुका यांच्या शिफारशी वरुन आजिनाथ जाधव सहसंपर्क प्रमुख माहिती अधिकार कार्यकरता समिती  महाराष्ट्र राज्य यांनी सामाजीक कार्यकरता प्रकाश नाकतोडे यांची पुर्व महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष पदी निवड केली आहे या निवड बद्दल भाष्कर भाऊ नाकतोडे,पंकज वानखेडे संघदिप देशपांडे ,जयंद्र चव्हाण ,सुरेश शेंडे,डॉ.थुलकर, गणेश सोनपींपळे ,युवराज भुरले,साजन बोकडे,महेश नाकतोडे,चारमोडे सर , धनराज हटवार,खेमराज भुते ,यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!