दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
ब्रम्हपुरी : मेंडकी -गायडोंगरी मार्गावर अज्ञात दुचाकीस्वाराच्या दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 सप्टेंबरला साडे नऊच्या दरम्यान घडली मृतक महिला ही गायडोंगरी येथील असून बायजाबाई आत्राम (वय 72)असे मृतक महिलेचे नाव आहे.
मेंडकी येथे आठवडी बाजार असल्याने बाजारामध्ये व बँकेत काम असल्याने गायडोंगरी वरून बायजाबाई आत्राम सकाळी नऊ वाजता घरून निघाली पायी जात असताना अज्ञात इसमाला गाडी थांबवून गाडीवर बसली काही अंतर पार केल्यानंतर बायजाबाई गाडीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!