बहुजन समाजाला एकत्र येण्यासाठी राजा रावणाला अंगीकारण्याची गरज

आदर्श शिक्षक बंडू मडावी यांचे प्रतिपादन

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - राजूरा येथे महात्मा राजा रावण  ह्यांच्या पुण्यतिथी निमित्याने आदिवासी समाजातर्फे महात्मा राजा  रावण ह्यांच्या मूर्ती चे अनावरण करून त्यांची पूजा करण्यात आली.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रकाश मरस्कोले, तर डॉ शारदा प्रविण येरमे व डॉ, प्रविण येरमे. हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी विस्तार अधिकारी मेश्राम साहेब, डॉ मधुकर कोटनाके, धीरज मेश्राम, बाबा कोड़ापे, मडचापे ग्राम सचिव साहेब, रमेश आडे सर, बंडू मडावी सर, बाळकृष्ण मसराम सर, लक्ष्मण कुमरे सर, आत्राम सर, राजेंद्र कुलमेथे,घनश्याम मेश्राम, संतोष कुलमेथे. अभिलाष परचाके, सुरेश पेंडोर, ह्यांची उपस्थिती होती. 
     आदर्श शिक्षक बंडू मडावी यांनी महात्मा राजा रावन यांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकत राजा रावण हे  अतिशय चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व असून बहुजन समाजाला एकत्र येण्यासाठी राजा रावणाला अंगिकारावे असे मत ते कार्यक्रमात व्यक्त केले.  राजा  रावण हे श्रीलंकेत असल्याचे सांगितल्या जाते मात्र राजा रावण हे श्रीलंकेत ले नसून ते मध्यप्रदेशातील आहेत याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत अशीही माहिती आपल्या भाषणातून दिली. मनुवादी विचाराचे काही समाजकंटक राजा रावणाला बदनाम करून आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्याचा हा कट असून तो आपण राजा रावणाला अंगिकारून हाणून पाडू असेही ते बोलले. 
    डॉ.प्रविण येरमे, बाबा कोड़ापे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे संचालन धीरज मेश्राम सर ह्यांनी केले.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.सर्वश्री.मिलींद कोवे,प्रमोद कोवे,दिवाकर मसराम,प्रशांत कोवे,दोडकू मेश्राम,दिपक म्हैस्कर,तेजराम गेडाम,रवी आळे,दिनकर उईके ,विनोद उईके ,अभय उईके ,युवराज मेश्राम,गंगाधर सोयाम,अमर गेडाम,हरिराम नैताम,विवेक मेश्राम, नैताम सर पाथरी,विक्की कुलसंगे,तथा सौ.मेश्राम ताई,नैताम ताई,कोवे ताई,ताडाम ताई व अन्य समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!