राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा चिमूर तर्फे राज्य सरकारच्या विरोधात थाळी वाजवा आंदोलन संपन्न
उप विभागीय अधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना विवीध मागन्याचे दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - अखील भारतीय ओबीसी महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे राष्ट्रीय समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा चिमूर च्या वतीने थाळी वाजवा आंदोलन करून विवीध मागन्याचे निवेदण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवार ला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ मार्फत देन्यात आले.राज्यातील बावन टक्के ओबीसी समाजाला संविधानातील तरतुदीनुसार ज्या सोयी सवलती सुविधा मिळायला पाहीजे होत्या त्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या कालखंडात मिळाल्या नाहीत हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. या संदर्भात अखिल भारतीय ओबीसी पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा चिमूर च्या वतीने २०२१ मध्ये होवू घातलेल्या जातीनिहाय जनगणना केंद्र करत नसेल तर महाराष्ट्र शासनानी राज्यात जातीनिहाय जनगनणा करावी, ओबीसी समाजाला मिळत असलेल्या १९% आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देवू नये, १००% बिंदुनामावली केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार त्वरीत सुधारीत करन्यात यावी, चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ धुळे नंदूरबार नाशीक ठाणे पालघर जिल्ह्यातील आरक्षण १९ % करन्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागाची कार्यालये सुरु करूयात यावी आदी मागन्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच सर्व मंत्री सर्व आमदार व प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविन्यात आले.दरम्यान सर्व ओबीसी गुरुवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथे जमले होते. हुतात्मा स्मारक येथुन थाळी वाजवा आंदोलनाला सुरुवात झाली शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढुन आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या घरा समोर अर्धा तास थाळी वाजवा आंदोलन करन्यात आले. याचे निवेदण आमदाराचे प्रतिनीधी अरुण लोहकरे व किशोर मुंगले यांनी स्वीकारले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा चिमूर चे अध्यक्ष गजानन अगडे, सचिव रामभाऊ खडसंगे, किर्ती रोकडे, किशोर भोयर, प्रकाश झाडे, अशोक वैद्य रामदास कामडी धर्मदास पानसे कवडु लोहकरे राजेंद्र लोनारे दिलीप डुकरे इश्वर डुकरे रविंद्र उरकुडे पटवारी कोहपरे जर्नाधन केदार नरेंद्र बंडे श्रीकृष्ण जील्हारे, सभापती लता पिसे, प स सदस्य भावणा बावणकर, उषा हिवरकर,, उमेश हिंगे, श्रीरंग पिसे, अक्षय लांजेवार, भुषण कावरे हरीश पिसे आदी ओबीसी बांधव बहुसंख्येने उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!