हळूहळू सवय होईल
हळूहळू सवय होईल
पत्रकाराच्या लेखणीतून - विनायक रेकलवार
सृजनशिलता हा सृष्टीचा नियमच आहे. जुने पाडायचे आणि नवे उगवायचे.सृष्टी कडून ही सकारात्मकता आपण आत्मसात केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरूवात ही सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवूनच करावी , असा नेहमी तज्ज्ञांचा सल्ला असतो. लहानशी मुंगी हाच बोध आपल्याला देऊन जाते. नकारात्मकतेला कुठेही वाव नसावा. कोरोनाचा काळ आणि लॉकडाऊनची परिस्थितीने आपल्या सर्वांना तेच शिकवले. हळूहळू बदला. एका चांगल्या बदलत्या परिस्थितीचा भाग व्हा. तो बदल हळूहळू जाणवायला लागेल. किंबहुना तो बदल आपणच आपल्यात करून घेऊ. आत्मनिर्भरता,स्वयंरोजगार,स्वविचार,आणि स्वकौशल्य इत्यादी घटकांचा विचार स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच रूजलेला आहे.याच विचारांना आता नवी कलाटणी मिळत आहे. आपण 21 शतकातील साक्षीदार आहोत. कोरोनासारखी आलेली महामारी ,टाळेबंदीला अख्खा देश हिमंतीने मुकाबला करीत आहे. बदलत्या संकटाला, परिस्थितीला बदलत्या उपायांनीच तोंड दयावे लागतात ,हे देशवासियांच्या आता लक्षात आले आहे. जपानमध्ये सुत्सानीची लाट आली होती. दुस-या महायुदधाच्या काळात हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन शहर अणुबॉम्बने नेस्तनाभूत झाली होती. तरीही जपान सावरला.पुढे गेला.पुढे जात आहे.तेच आपल्याला करायचे आहे.
अनंत अमूची ध्येयाशक्ती,अनंत अन् आशा,किनारा तुला पामराला, कवीवर्य कुसुमाग्रज यांची ही ओळ बरेच काही बोलून जाते. या ध्येयाशक्ती प्रमाणे जणांच्या राहणीमानात सुधारणा पाहायला मिळत आहे. आमुलाग्र बदल करणे हा मानवी स्वभावच आहे. हिरो,हिरोईनची नवीन स्टाईल दुस-याच दिवसी आपल्याला कुणीतरी प्रत्यक्षात साकारलेली दिसते. इंटरनेटच्या युगात आपण नेट वर्कर झालो आहोत. क्षणात वर्क प्राप्त होत असते.बदलायला भरपूर वाव आहे म्हणून ब-याच गोष्टीतील सवयी बदलायला लागलेल्या आहेत. तांडावर मास्कचा वापर हा एक बदलत्या सवयीचा एक भाग बनलेला आहे. नव्हे, तर ती आता काळाची गरज बनली आहे. दूचाकी वाहनचालकास हेल्मेट वापरणे शक्तीचे आहे,तसेच मास्क शिवाय आता आपले साधे पानंही हलणार नाही. आरोग्याची काळजी हा आपल्या नित्याचाच एक भाग आधी होता, पुढेही राहील. परंतु तो अधिक सुरूक्षितपणे आपल्याला सांभाळायचा आहे. शाळा बंद,पण शिक्षण सुरू आहे.इंटरनेट , स्मार्टफोनच्या माध्यमातून थोडया फार ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, हाही एक महत्वाचा बदल म्हणावे लागेल.मध्यंतरीच्या काळात व्हॉट ऐन आयडिया सरजी,अशी एक अभिषेक बच्चनची मोबाईल वरून शिक्षणाची जाहिरात होती.तेव्हाची ती जाहिरात आणि आताचा होत असलेला बदल, आता कळायला लागला आहे. पुढेपुढे आपल्याला प्रत्येक सरकारी निमसरकारी आणि वेगवेगळया प्रतिष्ठानामध्ये हॅण्डवॉश ,हात धुवायला पाणी आणि सॅनिटायझर इत्यादी मानपानाच्या गोष्टी पाहायला मिळतील. घरी पाहूणे आल्यावर हातपाय धुवायला पाणी ,पाट आणि साबण ठेवत असू.ही आपली भारतीय संस्कृती होती. ती आता कोरोनाच्या काळात आपल्या स्वच्छतेसाठी अधिक घटट होत आहे. संकटाला ओळखून आरोग्य विषयक, स्वतःची काळजी घेणारे बदल आवश्यक आहे. आणि म्हणून आपण बदलांचा एक भाग बनूया. हळूहळू आपल्याला याची सवय होईल. तसा बदल मूल मध्ये जाणवायला लागला आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी सिग्नल दादा गांधी चौकात उभे झाले आहेत. सिग्नल न तोडता त्याप्रमाणे आपण सवय करून घेतलेली असेलच. नाहीतर चालान तुमच्या मागावर आहे. सुरूक्षितता आणि सकारात्मक बदलांचे पाठबळ घेऊन आपणच आपले रक्षक होवू या...!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!