" UNO च्या जागतिक मुलनिवासी दिवसाच्या निमित्ताने इतिहासाचे अवलोकन"
नेहा बैस
" UNO च्या जागतिक मुल निवासी दिवसाच्या निमित्ताने इतिहासाचे अवलोकन"
वसाहतवादा विरुद्व लढा हे 20 व्या शतकाचे वैशिष्ट्य राहिले. वसाहतवाध्यानी 15 व 16 व्या शतकात अमेरिका, आफ्रिका, आँस्ट्रेलिया,न्युझीलंड,अशा अनेक प्रदेशात गो-या लोकांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या.पादाक्रांत केलेल्या प्रदेशातील मुलनिवासींचा धर्म,संस्कार, आचार विचार, श्रद्धा, विश्वास, अर्थव्यवस्था समुळ नष्ट करायच्या हाच त्यांचा उद्देश होता.तसेच केले.
9 आँगस्ट 1982.ला जनजाती/आदिवासी लोकसंख्या ला घेउन पहिली बैठक झाली होती. भारत सरकारने 1982 ला सयुंक्त राष्ट्रसंघास भारतातील जनजाती/आदिवासी हे मुळनिवासी नाहीत व ईथे कोणताही मुळनिवासी समाज नाही.असे निवेदन दिले होते.1984-85 ला भारत सरकारने भारतात कोणीही मुलनिवासी वेगळा समाज नाही असे UNO ला निवेदन दिले होते.
1983 ला UNO ने मुलनिवासींच्या हक्काची सनद करण्यासाठी एक समिती नेमली या समीतीने शिफारशी केल्या.1993 ला जीनिव्हा येथील जागतीक परीषदेत मुलनिवासी च्या हक्का बाबत घोषणा पत्र प्रसिद्ध केले. यात 45 कलमाचे 8 भागात वर्गीकरण आहे. हे सर्व व या पेक्षाही जास्त अधिकार भारतातील अनुसुचित जमाती/जनजाती/आदिवासी ना भारतीय संविधान 1950 पासुनच देत आहे.
UNO ने 1989 ला " राईट्स आँफ इंडीजीनियस पीपल्स"घोषीत केले तेव्हा UNO च्या एकुन 189 देशापैकी फक्त 22 देशानीच यास स्विक्रुती दिली होती.
9 आँगस्ट 1994 ला UNO ने जागतिक मुलनिवासी दिवस जाहीर केला. UNO च्या आकडेवारी प्रमाणे जगातील 90 देशात UNO प्रमाणे मुलनिवासी भारतीय संविधान प्रमाणे अनुसूचित जमाती/जनजाती/ST. ...35 ते 40 कोटिच्या घरात राहतात.7000 भाषा बोलली जाते.5000 अलग अलग संस्क्रुती चे आहेत.जगाच्या लोकसंख्येच्या 5% मुलनिवासी/जनजाती/आदिवासी आहेत.भारतात 11% जनजाती आहेत.15% भाग/हिस्सा जगातील गरीब लोकात येतो.
युरोपीय वसाहतवाद्यानी अमेरिका, आँस्ट्रेलिया येथील 11 कोटि मुलनिवासी जनतेचा नरसंहार केला.कोलबंसने 1492 आफ्रिका ते अमेरिका या प्रवासात 75 लाख आफ्रिकन मुलनिवासी मारले.या मुळे येथील मुलनिवासी वाट मिळेल तिकडे पडुन गेले.पण हे सर्व तेथील मुलनिवासी होते..पण भारतात असा नरसंहार झाला नाहि येथील जनजाती/आदिवासी शेकडो वर्ष राजे होते.आजहि किल्ले आहेत.
2001 ला दक्षिण आफ्रिका येथील डरबन शहरात UNO ने मुलनिवासी विषयावर चर्चा सत्राचे आयोजन केले होते. भारता तर्फे प्रतिनिधी म्हनुन मा.विदेशमंत्री मा.उमर अब्दुल्ला व काँग्रेस चे खासदार मा.सुशिलकुमार शिंदे उपस्थिती होती भारताची बाजु ठेवताना म्हणाले भारतात वेगळे कोणी मुलनिवासी राहत नाही.
भारत UNO प्रमाणे चालत नाही.भारतीय संविधान प्रमाणे चालतो. 9 आँगस्ट आपण अनुसूचित जमाती/जनजाती/आदिवासी जागतिक दिवस म्हनुनच साजरा करु या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!