पोलिस स्टेशन राजाराम खांडला तर्फे 150 शेवगा वृक्ष शेतकऱ्यांना वाटप
नेहा बैस
दिनांक 8 ऑगस्ट रोजी राजाराम गावात 150 शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले.
सोशल डिस्टन्स चा पालन करुन काही गरजू निवडक शेतकऱ्यांना उप पोलिस स्टेशन ला बोलावून शेतकऱ्यांना शेवग्याचे आहारातील महत्त्व सांगुन शेवगा लागवड कशी करावी व तसेच शेवग्याचे आर्थिक दृष्टीने किती महत्व आहे याची माहिती देण्यात आली. व उप पोलिस स्टेशन ला देखील 15 झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना शेवगा लागवडीचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी उप पोलिस स्टेशन राजाराम खांडला चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद भोरे साहेब, PSI खटावकर सा, PSI कोल्हे सा, PSI कड सा तसेच पोलीस स्टेशन चे कर्मचारी व राजाराम गावातील नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!