लावारी येथे रान डुकराचे मास विक्री प्रकणात दोघांना अटक
चंद्रपूर (प्रतिनिधी)
प्रितम साखरकर
कोठारी गावाजवळील अपघातात मृत झालेले रानडुक्कर ला दुचाकी वाहनाने लावारी येथे कापून मास विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतांना वनविभागाने दोन आरोपींना केली अटक.
दि. 07 ऑगस्ट रोजी कोठारी गावालगत रस्ता अपघातात मृत झालेले रानडुक्कर दुचाकी वाहनाने लावारी येथे शिवराम राजीराम गडमवार राहणार लावारी व गंगाराम रामदास टेकाम यांनी आणले व त्यास कापुन विक्री करत असतांना वनकर्मचारी क्षेत्र सहाय्यक ए. डी. मल्लेलवार, वनरक्षक मनोहर धाईत, राकेश शिवनकर, आईटलावार, व प्रतापगिरवार यांनी आरोपींना अटक केली.
तसेच आरोपी कडून 8 kg रानडुक्कराचे मांस, कुन्हाड, सुरी, वजन 500 gm दोन नग, किलो काटा, जर्मनी गंज 2 नग, मोटार साईकल इत्यादी सामग्री जप्त करण्यात आले व त्यांचावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44 व 51 अन्वये वन गुन्हा क्र. 8/18 नोंद करुन दोघांना बल्लारपुर न्यायालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपास उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांचे मार्गदर्शनात बल्लारशाह चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!