पवनपार येथे वाघाने केला शेतक-यावर हल्ला
पवनपार येथे वाघाने केला शेतक-यावर हल्ला
आरडा ओरड केल्याने थोडक्यात बचावला
जितेंद्र पेंदाम सिंदेवाही (प्रतिनिधी)
चंद्रपुर जल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील एका शेतकर्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या दरम्याण घडली.
सविस्तर वृत पवनपार परीसरात आता शेतीची कामे मोठ्या जोमाने सुरू आहेत.
काम झाल्यावर दुपारच्या वेळी शेतकरी आपली गुरे शेताजवळ असलेल्या खाली जागेत बैल चारतात.
आज असेच शेतकरी आपली शेतीचे कामे करून बैल चारत असतांना अचानक दबा धरलेल्या वाघाने गोकुळ रुषी निकुरे वय साठ वर्षे या शेतक-यावर हल्ला केला. यात शेतकरी जखमी झाला. सोबत चारपाच शेतकरी असल्याने व त्यांनी आरडा ओरड केल्याने तो शेतकरी गोकुळ निकुरे वाचला.
ही घटना कम्पारमेन्ट नं २८२ खोदतलावजवळ घडली.
अचानक याच रस्त्याने जंगल गस्त करून येत असतांना एस के येरमे वनरक्षक ही घटना पाहिली.
वनरक्षक यांनी लगेच जखमीला
गुंजेवाही येथील प्राथमिक केंद्रामध्ये उपचाराकरीता पाठवन्यात आले .
सदर क्षेत्र जंगलव्याप्त असुन त्यात वाघांचा वावर आहे.त्या क्षेत्रात शेतकर्यांनी बैल चारायला जावू नये असे आवाहन एस. के. येरमे वनरक्षक यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!