दारू ची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात.. 6 लाख 24 हजार रू.माल जप्त



शंकरपुर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - शंकरपूर येथून जवळ असलेल्या साठगाव येथे विदेशी दारू ची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला ही घटना शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता घडली असून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथून झायलो MH 03 BS 7502 या चार चाकी वाहनाने विदेशी दारू ब्रह्मपुरी येथे नेण्यात येत होती.
हे वाहन अतिशय भरधाव वेगाने येत असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटून साठगाव येथिल उभ्या असलेल्या दुचाकी गाडीला धडक देऊन ते वाहन बसस्थानक जवळील चहा टपरी मध्ये घुसले ही टपरी बंद असल्याने जीवित हानी टडली ही बाब गावकऱ्यांना माहीत होताच तेथे एकच गर्दी झाली वाहन हे महिला चालवीत होती गावकऱ्यांनी अधिक चौकशी केली असता त्या वाहनात विदेशी दारू च्या पेट्या आढडुन आल्या ही माहिती पोलिसांना मिडताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वाहनात 24 हजार रुपये किमतीच्या 80 विदेशी दारू च्या निपा  व सहा लाख रुपयांचे झायलो वाहन असे एकूण सहा लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी राहुल मैन्द  व प्रतिभा मैन्द या पती, पत्नी वर गुन्हा नोंद केला आहे. विषेश म्हणजे पत्नी प्रतिभा ही वाहन चालवीत होते सदर कारवाई शंकरपुर चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनाेद जांभळे, पोहेकाॅ.रंगराव खोबरागडे, पोशि मंगेश बनसोड, पोशि अमित उरकुडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!