जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष 




जीवनाच्या प्रवासात खुप अडचणी येतात त्या अडचणीला किंवा परिस्थितीना मात करुन जो व्यक्ती समोर जातो, तोच यशस्वी ठरतो. रस्त्यावर चालतानां दगड, काटे याचा सामना करूनच समोर जावे लागते, चालतांना पायाला ठेच लागल्यावरच माणूस शहाणा होतो. आणि समोर हुशारीने पाऊले टाकतो. सोपं असतं म्हणायला जीवन जगणे हे कठीण नाही. पण त्यांनाच कळतं जीवन जगणं हे काय असतं. अनेक अडचणी येतात, अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्यांना दूर सारूनच समोर पाऊल टाकावे लागते. दुःखाचा डोंगर समोर आला म्हणून मागे पाऊल नका टाकू. त्याच दुःखाच्या डोंगराचा सामना करूनच सुखाचा ओलावा पदरी पडेल. अडचणी तर अनेकांना येतात पण त्या अडचणीवर विजय मिळवितो आणि यश संपादन करतो तोच खरा जीवनात विजयी ठरतो.  

 जीवन मॅरेथाॅन स्पर्धेपेक्षा कमी नाही. जीवन जगत असतांना माणसाला सतत धावावे लागते. कधी पोट भरण्यासाठी, कुटूंबाचा पालनपोषण करण्यासाठी, तर जीवन घडविण्यासाठी धावावे लागते. या जीवनाच्या चक्रात जो व्यक्ती धावत नाही. तो यशस्वी कधीच होत नाही. त्याचे आयुष्य निरर्थक ठरते. 

 कधीकधी आयुष्यात अशा घटना घडतात. त्यामुळे पुर्ण जीवनच बदलून जातो. त्या घटनेतून बाहेर पडूनच जीवन जगायचे असते. असेच असते जीवन ! त्याच दुःखाचा विसावा धरून राहले तर कधीच पुढे जाऊ शकत नाही. दुःखाचे दिवस आठवले तर सुखाच्या क्षणाचा महत्व वाटतो. खरंच जीवन एक संघर्ष आहे. 
 ना देख तु पिछे मुड के  
वहा तो बिता हुआ कल है  
अब जी ले नऐ तरेसे  
अभी तो जीने के अछे पल है  
कर हासिल तु मंजिल अपनी  
सिख ले इस दुनिया के तोरतरिके  
अब जी ले नऐ तरेसे  
अभी तो जीने के अछे पल है  

 खरंच मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ नाही, उलट आपल्यालाच त्याचा मानसिक त्रास होईल. पण पुढे पुर्ण तुमचे आयुष्य आहे. तेच आयुष्य कष्टाने, मेहनतीने जगले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल. म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर ! जेवढे प्रयत्न कराल तेवढेच यश तुम्हाला मिळतील. नेहमी आनंदित राहा, आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कुणाला माहित आहे की, जीवन हे किती दिवसाचे असते. म्हणून गेलेल्या क्षणाला आठवून जगण्यापेक्षा आलेले क्षण आनंदाने जगणे हीच जीवनाची कला. 

 राणी भोयर, मारोडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!