जांभुळघाट येथे मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या ट्रकने दुचाकी वाहानाला मारली कट




तालुका - प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्याती मौजा जांभुळघाट येथे आज दिनांक.०२/०८/२०२० ला सकाळी १०:०० वा.मुरूम उत्खनन करणाऱ्या ट्रकने दुचाकी वाहनाला कट मारली व ते दोन्ही व्यक्ती रोड च्या कडेला पडले.एक व्यक्ती जखमी झाला असुन त्याच्या पायाला मार होता तर दुसऱ्याला किळकोर जखमी झाला.तो ब्रम्हपूरी वरून चिमुर कडे जात होता.यात कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. मागील दोन महिण्यापासुन  (एस.जि.एम) कंपनी द्वारे मुरुमाचे उत्खनन सुरू आहे.या उत्खननामध्ये १५ ते २० ट्रक,हायव्हा व टॅक्टर वाहन सुरू आहेत. तर काही महामार्गाच्या कामावरील हायव्हा,ट्रक व गाडगे यांची केसर खान कळंब आबा नाव लिहिलेली ट्रक व टॅक्टर नेहमी जोमाने मुरूम उत्खननावर  सुरू असतात. पण या उत्खनाला किती वाहानांची परवानगी आहे.आज रविवार दिवस लिज ची परवानगी होती का ?


या सर्व प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे.हे वाहन नेहमी रफ पध्दती ने चालत असतात.सामान्य वाहानाना साईड न देणे कटा मारीत चालविणे असे असता.वाहतूक पोलीस सुध्दा यांच्यावर कारवाही करीत नाही.मोळी वरून वेगाने मोळ काटीत असतात.यावर आळा घालने गरजेचे आहे.सामोर शुध्दा अशा प्रकारे वाहन चालविणे यामुळे मोठ्या घटना होण्याची दाट शक्यता आहे.याची दखल भिसी व चिमुर पोलीश स्टेशन ने घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!