वाढदिवसाचे औचित्य साधून टायगर गृप चामोर्शी तर्फे गोरगरीब जनतेला जीवनावश्यक किराणा किट चे वाटप



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.०२/०८/२०२० कोरोना कोविड - १९ या रोगाची संपूर्ण भारतात साथ सुरू असून गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही. पैशा विना जीवन जगणे कठीण झाले आहे. एक वेळ ची पोटाची भूख पूर्ण करण्यासाठी काम नाही. या संपूर्ण परिस्थिती चा आढावा घेऊन
टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक पै.जालिंदर जाधव व अध्यक्ष पैं.तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार टायगर ग्रुप गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख दिपक बारसकडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप चामोर्शी चे  सदस्य अनिल पारखी , यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
आणि गरजू गोरगोरिब लोकांना किराण्याची किट वाटप करण्यात आली.  यावेळी टायगर ग्रुप चामोर्शी चे प्रमुख मयुर चलाख , ऋषि गोरदवार, प्रफुल भांडेकर, चेतन येलुरे ,नरेश बुरांडे ,आकाश चिचघरे, मयुर सोनटके, अजय चलाख,आकाश चलाख, पंकज शेट्ये, सुनील चलाख,शुदर्शन लटारे,बासुदेव सरकार, अभिषेक बुरे, विशाल चलाख, विपुल कोहळे, अंकुश बुरांडे, किरण चलाख,सागर चलाख,रजत मलिक,अंकित चलाख,क्रिष्ण कपाट, व आदी टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!