भद्रावती मध्ये वाघ नख विक्री करिता ग्राहक शोधतांना 2 आरोपीला अटक




चंद्रपुर
मोहम्मद सुलेमान बेग,

गेल्या काही दिवसापूर्वीच ताडोबाच्या बफर झोन मधील मुधोली गावात वाघाच्या मिशा व वाघाच्या नखा सोबत काही आरोपी ना ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्याच गावातील वाघ नख विक्री करिता भद्रावती शहरातील गुरु नगर मधील ही एक घटना उघडकीस आली.
वाघ नख विक्री साठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच तत्यांनी सापळा रचला व प्रशांत बालाजी बावणे (वय 26) राहणार मुधोली, विकास ऋषी बावणे (वय 22) राहणार भद्रावती गुरू नगर असे 2 आरोपी एका वाघ नख सह अटक करण्यात आले. दिनांक 1 ऑगस्ट रोजी भद्रावती शहरातील गुरू नगर परिसरातील वाघ नख विक्री करिता ग्राहक शोधतांना पकडण्यात आले.ही सर्व कारवाही भद्रावती ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेवण विभाग प्रमुख अमोल तुलजेवार, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, निकेश टेंगे यांनी केली. सदर प्रकरण वन विभागाच्या सम्बधित तयेत असल्यामुळे आरोपींना वन विभागाकडे सोपविण्यात आले आहे व पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!