कोदामेळी येथील नाथजोगींना घरकुल केव्हा मिळणार
४० ते ५० वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत
भंडारा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील कोदामेळी हे गाव गोरखनाथ या भटक्या लोकांमुळे प्रशिद्धीस आलेले गाव असून गावात ईतर नागरिका प्रमाणेच यांचेही कुटुंब उन,वारा,पाऊस एका चंद्रमोड्या झोपडीवर सतरंजी अंथरून काढीत असून चक्क एक दोन नव्हेतर गेल्या ४० ते ५० वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत काढले असून आजही तिच परिस्थिती दिसून येत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या गावावरून परिसरातील कित्येक गाव आजही पायी पालथी घालून आपल्या संसाराचा गाडा कसेबसे चालवितांनी दिसतात.नाथजोगी समाजात आजही अशिक्षित पणामुळे शासकीय योजना बद्दल काही कळत नाही योजना येतात आणि निघून जातात या समाजाती सर्वाचे पोट हे हातावर आणने आणि पाणावर खाने ही दररोजची दिनचर्या आहे यात परिवाराचे पालनपोषण करणे ह्या महागाईच्या काळात अगदी अंगावर आल्याचे वास्तव नाथजोंगींना बघीतल्यास समजून येते.उन असो अथवा पाऊन गेल्या ४० वर्षांपासून सर्वकाही अंगावर घेऊनही कधी मदतीची आश नसनाऱ्या नाथजोगींची शासनाला भुल का पडावी.शासन प्रशासनातील नेते तर अधिकारी या महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशा पोकळ बाता हानुन शक्तीप्रदर्शन करतात मात्र आजही कोदामेळी येथील नाथ लोक घरकुल योजनेपासून वंचित असून आपल्या चंद्रमौळी झोपडीवर ताळपत्री अंथरून कसेबसे पावसापासून आपले बचाव करित आहेत मात्र आतातरी शसनाला जागे होऊन वेळेतच सदर गावातील नाथजोगीना तात्काळ निवारा देऊन एक हक्काचे घरकुल देण्याची गरज भाषत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!