गुणवंतांचा सत्कार गुणवंतांच्या दारी
भंडारा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - दिनांक.१७/०८/२०२० राष्ट्रीय काॅग्रेस ची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडन्ट युनियन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एन एस यु आय)शाखा लाखांदुर च्या वतीने तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयात इयत्ता १० वी ,व १२ वी ला गुणानूक्रमे प्रथम ,द्वितीय ,तृतीय येणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हणून "गुणवंतांचा सत्कार गुणवंतांच्या दारी " ही संकल्पना राबविण्यात आली.देशावर असलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग हे सुत्र ध्यानात ठेवून प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून एन. एस. यु .आय शाखा लाखांदुर च्या वतीने करण्यात आला. यात तालुक्यातील बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, शिवाजी विद्यालय, जि.प. विद्यालय, सेवक भाऊ वाघाये पाटील ज्यु काॅलेज,सिद्धार्थ ज्यु काॅलेज, मातोश्री बाळजाबाई बुरडे हायस्कूल आसोला ,सुबोध महा.मासळ जि प हाय तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी.शसीकांत दैठणकर महा.बारव्हा इत्यादी महाविद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिपक भाऊ बगमारे. उपाध्यक्ष आशीष ठाकरे. शहर अध्यक्ष नितीन भाऊ पारधी .गर्ल्स युनीटी उपाध्यक्षा दिव्या ताई ठाकरे .तुषार दिवटे प्रवीण दहिकर युवक काॅग्रेस अध्यक्ष आसोला आणी एन.एस. यु.आय चे पदाधिकारी उपस्थित होते.



Good efort for new genaration
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवा