मोहर्ली येथील नारायण नामदेव कारमेंगे यांच्या राहत्या घराला आग






चंद्रपुर (प्रतिनिधी) :-
प्रितम साखरकर


मोहर्ली येथील नारायण नामदेव कारमेंगे यांच्या राहत्या घराला आग लागण्याची घटना दि. 30 जुलै रोजी रात्री 7.00 च्या सुमारास घडली. घराला आग लागल्याची माहिती होताच आग विजविण्यासाठी ग्रामस्थाने सहकार्य केले त्यामुळे जीवित हनी टळली. प्राप्त माहितीनुसार आग लागली त्यावेळेस घरी फक्त नारायण कारमेंगे होता पत्नी शेतीच्या कामाला गेली असल्याममुळे तिच्या अंघोळी करिता चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवले होते व छोटी मुलगी बाहेर खेळत होती. घर कवेलु व ताटव्याचे असल्याने चुलीवरील काडी ची तितकी ताटव्यावर लागल्याने आग पेट घेतली पाहता पाहता आगेने जोर धरला. आग विजविण्यासाठी गावातील ग्रामस्थ धावून आले .त्यानंतर नारायण नामदेव कारमेंगे याला विचारांनी केली असता अंदाजे एक लाखाची नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोणा माहामारीच्या काळात घर जळल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच त्यांची परिस्थिती अतिशय बिक्कट असल्याने शासनाने त्यांची मदत करावी अशी जनतेची अपेक्षा आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!