गंगासागर हेटी येथील रोपवनाच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप

🔷गंगासागर हेटी येथील रोपवनाच्या कामात भ्रष्टाचाराचे पत्रकार परिषदेत आरोप.
🔷शेकडो हेक्टर वनजमीनीवर अतीक्रमनाचे ही आरोप.
🔵कैलास अम्रुतकर आणि होमराज खांडेकर यांनी केले आरोप.
ब्रम्हपुरी वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील मौजा, ऊश्राळ मेंठा नियातक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील कक्ष क्र. 90 P यातील 25 हेक्टरवर क्षेत्रात मिश्र वनरोपवणाचा कार्यक्रमा अंतर्गत तलोधी वन परिक्षेत्राचे अधिकारी यांनी व कर्मचारी वर्ग यांनी या कामात प्रतिष्ठित नागरिकांच्या नाव समाविष्ट करून लाखो रुपयांचे बिलाची उचल केल्याचे झनझनीत आरोप, श्री होमराज खांडेकर,व कैलास अम्रुतकर यांनी केलेला आहे.
वनरोपवनाचा भरगच्च कार्यक्रम (MAP) अंतर्गत मिश्र रोपवनाच्या कामाकरिता सन 2017-18 व 2019 च्या कामाच्या अंदाजपत्रक नुसार अंदाजे 17,00,000/- (सतरा लक्ष रुपये) चे तांत्रीक मान्यता मिळाली. व या कामाकरीता तळोधी वनपरिक्षेत्रातील बाळापूर, येनुली, आकापुर, उश्राळ मेंढा येथील मजूरांना रोजगार निर्मिती करीता वन विभागाने मजुरांना कामावर समाविष्ट करण्यात आले होते. परंतु सोबतच यांच परीसरातील प्रत्यक्ष कामावर न जानारे शेकडो प्रतिष्ठित लोकांच्या नावाला व बालमजुरांची नावे अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करून त्याचे नावाने मोठ्या रकमेची उचल केल्याचे सनसनीत आरोप पत्रकार परिषदेत केला.
त्याचप्रमाणे कक्ष क्र.90 मध्ये व परिसरातील शेकडो हेक्टर वनजमीनीवर स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने व्रुक्षतोड करून लोकांनी अतीक्रमन केलेला आहे त्यामुळे वन्य प्राण्यांच्या त्रास परिसरात वाढल्याचा आरोपही या परिषदेत कैलास अम्रुतकर यांनी केला.
सदर मिश्र रोपवनाच्या कामात प्रतेक्षात कामावर न गेलेल्या मजुरांच्या नावाने लाखो रुपयांची उचल करुन शासनाची आर्थिक लुट केली असल्याची तक्रार ब्रम्हपुरी वनविभागात केली असुन सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारच्या चौकशी चे आदेश अजुनही देन्यात आले नाही. तरीही सदर प्रकरनाची चौकशी करुन संबंधित तळोधी वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचारी यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या पत्रकार परिषदेत कैलास अम्रुतकर व होमराज खांडेकर, यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, माजी भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, दिलीप गायकवाड सरपंच गंगासागर हेटी, धनराज बावनकर बाळापुर, केवळराम कामडी हेटी,आनंदराव कामळी हेटी. यांची या वेळी उपस्थिती होती.
"मिश्र रोपवनाच्या कामाकरिता प्रतेक्षात मजूर सहभागी झाले होते. कोनतेही बोगस मजूर नाही." के. डी. गरमडे वनक्षेत्र सहाय्यक वनपरिक्षेत्र तळोधी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!