शेतावरून काम करून घराकडे परत येतांना विज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू



तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी)

चिमूर :- दिनांक. १ ऑगस्ट २०२० सायंकाळची कन्हाळगाव - चिमूर महामार्गावर एक घटना घडली असून चिमूर तालुक्यातील भिसी गावापासून पासून चार कि.मी. अंतरावरील  कन्हाळगाव येथील रहिवासी असलेल्या  ६६ वर्षीय शेतकरी महिलेचा स्वतःच्या  शेतामध्ये काम करून घराकडे परत येतांना विज पडून  जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव मंजुळाबाई रामकृष्ण मुरस्कार वय - ६६ वर्षे आहे. हि घटना   शनिवारी १ ऑगस्ट ला सायंकाळी ०६:३० वाजता च्या दरम्यान भिसी ते चिमूर महामार्गावर  कन्हाळगाव पासून अर्धा किमी अंतरावर घडली.ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!