वाघाच्या हल्यात गुराखी जखमी
सिंदेवाही (प्रतिनिधी ):
सुनील घाटे
दिनांक 4/08/2020 रोज मंगळवार ला जामसाळा नवीन येथे बालाजी सावसाकडे वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
शिवणी वनपरिक्षेत्र अंर्तगत जामसाला ( नवीन ) येथील गुराखी नामे बालाजी पांडूरंग सावसाकडे हा गुरे चराई करीता गेला असता कक्ष क्र 269 येथे दबा धरुन बसलेल्या वाघाने बालाजी वर हल्ला केला व त्याच्या मनेवर नखाचे मोठे घाव झाले तसेच खाद्यावर व पाठीवर घाव घातला त्यात तो जखमी झाला ही माहिती वनविभागाला कळताच वनकर्मचारीचा ताफा दाखल होऊन कारवाही केली व त्याल उपचारासाठी वनविभागाच्या गाडीने सिंदेवाही ग्रामीण रूग्णालय येथे दाखल करण्यात आले व नंतर तेथून चंद्रपुर ला हलवीण्यात आले आहे. त्वरित मदत म्हणून तीन हजार रुपये व २ वनरक्षक सोबत देण्यात आले.
पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!