ताडोबाच्या मोहर्ली वन परीक्षेत्रात लाखोचा घोटाळा, अधिनस्त वन कर्मचाऱ्यांनी केली तक्रार.




चंद्रपुर :

मोहम्मद सुलेमान बेग / प्रितम साखरकर

ताडोबाच्या मोहर्ली वन परीक्षेत्रात लाखोचा घोटाळा,
अधिनस्त वन कर्मचाऱ्यांनी केली तक्रार.


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात लाखो रुपयेची घोटाळ्याची माहिती उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात मंजूर केलेले काम ते पूर्ण करण्यासाठी नाही, तर पैसे घेण्यासाठी आहे.
असे ताडोबाचे अधिनस्त वन कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वरून हे प्रकरण उघडकीस आले आहे.

मोहली वनपरीक्षेत्रात 4 कि.मी रास्याचे बांधकाम करणे होते, पण एक  ही  कि.मी. चा सुध्दा रस्ता बनलेले नव्हता.परंतु त्या कामाचे  पैसे मात्र उभे केले होते. हे प्रकरण मोहर्ली कोर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांच्याशी संबंधित आहे.

प्राप्त माहितीनुसार शासकीय काम न करता अधिनस्त वन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून बोगस प्रमाणाचा बनवून मर्जीतील ठेकेदारांमुळे पैश्याची उचल करीत असल्यामुळे अधिनस्त वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठाना तक्रार केलेली आहे.
या प्रकरणात बरेेेच कामे न करता नातेवाईक ठेकेदारांच्या नावाने शासकीय कामे न करता पैश्याची परस्पर उचल केलेली आहे.

कोरोनाच्या काळामध्ये शासनाने रोजनदारी मजूर कमी करण्यास सांगितले असतांना ही प्रत्येकशात कामावर असलेले मजूर कमी केले व कामावर नसलेल्या चंद्रपुर व बाहेर गावातील रोजनदार मजूर दाखवून पैश्याची उचल केलेली आहे.
तसेच  तक्रार दिल्याच्या नंतर  ही  मोहर्ली कोर वनपरिक्षेत्र अधिकारीची मनमानी सुरू असून बोगस प्रमाणाच बनविले आहे.

ताडोबा मुख्य वनसंरक्षक, संरक्षक आर. आर.  कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे व पुढील चौकाशी सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!