माणुसकीचं नातं
माणुसकीचं नातं
माणुसकीचं नातं म्हणजे नेमकं काय ??
नातं म्हणजे, एखाद्या जिवलग व्यक्तीची आपण स्वतः पेक्षा जास्त काळजी करतो म्हणजेच नातं!!
माणुसकी, ही आपल्या मनावर अवलंबून असते. आणि 'मन' हा खूप नाजूक असा एक धागा आहे.!! ज्याला तुटायला एक क्षण ही लागत नाही, आणि जुळायला अख्ख आयुष्य मात्र केव्हा निघून जातं! कळतच नाही. कधी आपले जिवलग व्यक्ती साथ सोडून जातात तर कधी नातेवाईक, मित्र - सखा. कधी - कधी आपण एखाद्या व्यक्तीला तुच्छ जाणत असतो, पण तेव्हा आपण त्यांच्या मनाचा विचार करत नाही. जेव्हा आरश्याच काच पूर्ण असतो, तेव्हा आपला चेहरा स्पष्ट दिसतो. पण तोच कांच जर तुटल, तर आपले अनेक प्रतिरूप त्या आरश्यात दिसतात. मन सुद्धा अगदी तसच असतं. मन एकदा तुटलं की, त्या व्यक्तीचे चांगले वाईट असें अनेक रूप आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि त्या व्यक्तीवर आपण परत विश्वास करू शकत नाही. "विश्वास हा असं पक्षी आहे, जो एकदा उडालं की, परत कधीच येत नाही"!! आणि कितीही प्रयत्न केल, तरी मन कधीच जुळत नाहीं. फरक फक्त एवढाच असतो! आरश्याचें तुकडे आपल्याला दिसतात. पण मनाचे तुकडे मात्र आपल्याला दिसत नाही. आरश्याचें तुकडे शरीराला घाव करतात, तर मनाचे तुकडे संपूर्ण आयुष्याला वेदना देतातं. कधी - कधी आपण का? अस वागतो! की माणुसकीच नातचं विसरून जातो. जी एकमेकांना मदत करायची आहे, ते आपण करणार नाही. पण मात्र जो समोर जातोय, त्याला मागे खिचणार आणि जो मागे आहे, होतकरू आहें, त्याची थट्टा करणार!! हीच काय? आपली ती *माणुसकी*.
थट्टा इथं परत आपल्या मनाचं प्रश्न उद्भवतो, थट्टा करताना आपण कुणाचं विचार करत नाहीं . हो ना!! अस म्हणतात. "आदर द्या आणि आदर घ्या." पण आपलं याबाबतीत उलटंच असतं. आपण आदर घ्यायची अपेक्षा तर करतो, पण कुणाचं आदर कस? करायचं हा विचार मनात सुद्धा आणत नाही.
ही माणुसकी नाही जे एकमेकांना दुखावते, वेदना देते. मात्र प्रतिज्ञा म्हणताना आपण अस म्हणतो, की " भारत माझं देश आहे, सर्व भारतीय माझें बांधव आहेत."
पण असं काहीच नाहीं आहे हे आपल्या वागणुकीवरून दिसून येतं. फक्त म्हणणं आपल्याला सोपं वाटतं, म्हणून आपण हे म्हणतो. अगदी अस म्हटलं तरी चालेल. कारण या भारत देशांत ज्या भिन्न- भिन्न जाती जमाती आहेत. त्यामध्ये आज सुद्धा भेदभाव करताना दिसून येतं. अस म्हणतात ना "जस दिसतं तसं नसतं म्हणूनच हे जग फसतं" हे बरोबरच आहें!! आज भारताचं प्रत्येक नागरिक जर गरीब, श्रीमंत, भेदभाव, जातीयवाद, आणि धर्मीयवाद , विसरून जर माणुसकी च्या नात्यांनी वागेल ना!! तर सर्व भारतीय बांधव आहेत हे दिसून येईल. सर्व मनुष्य समान आहेत, सर्वाना मूलभूत अधिकार देण्यात आलं आहे. तर मग आपण का माणुसकीच नातं विसरतोय. सर्वाना माझी विनंती आहे की, एखाद्या व्यक्तीचं मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या मनाला जपा.
हेचं आपल माणुसकीच नातं आहे..!!!!
रेश्मा गेडाम
मारोडा, तह. मूल, जिल्हा चंद्रपूर
!!धन्यवाद!!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!