भाजप सरकारने इंधन वाढ करून गरीबांचे खिशे कापले - खा.बाळूभाऊ धानोरकर



इंधन दरवाढीविरोधात वरोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन  

वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : -  दि.०२/०८/२०२० इंधन  दरवाढीविरोधात वरोरा येथील जाजू चौकात काँग्रेसतर्फे निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. खा.धानोरकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. देशाचे जवान शहीद होत आहे,पेट्रोल डीझेलची भरमसाठ भाववाढ होत आहे.महागाईची झळ सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
त्यामुळे भाजप सरकारने गरीब जनतेचे खिसे कापण्याचे काम या सरकारने केले आहे . त्यामुळे मोदी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.कोविड - १९ च्या संकटकाळात केंद्र सरकार इंधनाच्या किमती वाढवून जनतेची लुट करीत आहे असे आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.पेट्रोल डीझेलची दरवाढ त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुद्धा कमी कराव्यात असे प्रतिपादन केले. या किमती कमी न झाल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही आमदार धानोरकर यांनी दिला.माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर,बाजार समितीचे सभापती राजेन्द्र चिकटे,बसत सिंग, छोटू शेख आधी काँग्रेस  कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!