चिमूर पोलिसांनी केले अवैद्य दारू तस्करी करणारे दोन आरोपींस अटक
चंद्रपुर:-
मोहम्मह सुलेमान बेग
चंद्रपुर जिल्ह्याची दारू बंदी आल्यावर देखील अवैध दारू चे प्रमाण फार वाढलेले दिसून येत आहे दिनाकं 2 जुलै 2020 रोजी सकाळी 2.00 च्या सुमारास वरोरा ते चिमूर रस्त्याने देशी दारू ची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने चिमूर पोलिसांनी पाळत ठेवले असतांना शेंडेगाव येथील आठवले कॉलेज जवळ एक पांढऱ्या एक पांढऱ्या रंगाचे वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी केल्यास शेवरलेत कंपनी ची वाहन क्र MH 31 CR 8728 मध्ये आरोपी रिझवान अब्दुल बशीर रा. नागपूर , कुणाल नागोराव हांडे रा. हिंगणघाट हे जखमी अवस्थेत वाहनात अडकून असल्याचे दिसून आल्याने शेंडेगाव येथील गावकऱ्याच्या मदतीने तात्काळ अंबुलन्सने रुग्णालय चिमूर येथे उपचारसाठी पाठविण्यांत आले.
वाहनात असलेला देशी दारूचा मुद्देमाला सह एकूण 4,59,400 रु चा मुद्देमाल चिमूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई अनुप तारे , उप विभागीय पोलीस अधिकारी मूल अति.कार्यभार चिमूर , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पोलिस स्टेशन चिमूर यांचे मार्गदर्शनात पी.एस.आय. अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे, विजय उपरे व शेंडेगाव आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!