शेतकऱ्यांंनी विविध शासकिय योजनेचा लाभ घ्यावा- आमदार प्रतिभा धानोरकर.
चंद्रपुर :-
मोहम्मद सुलेमान बेग
1 जुलै 2020 रोजी वरोरा तालुक्यातील तुळाना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शेतकऱ्यांनी केले कृषिदिन साजरा केला यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यानी विविध शासकिय योजने चा लाभ घ्यावा असे आव्हान यांनी कृषीदिना निमित्य केेले.
कृषीदिना निमित्य हरीतक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्मृतीस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्याला भारतात हरितक्रांती ची सुरूवात कशी झाली , केव्हा आणि कोणी केली , आणी कोणी केली कृषीदिनाचे महत्व काय आहे हे शेतकऱ्यांना पटवुन दिले असे अनेक विषयावर शेतकऱ्यासोबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संवाद साधला.तसेच शेतपिकाची पाहणी आपल्या शेतकरी बांधवा सोबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
यावेळी मंचावर वरोरा पंचायत समिती सभापती रविंद्र धोपटे, उपसभापती संजीवनी मिलींद भोयर, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी प्रकाश, पंचायत समिती कृषी अधिकारी धात्रक, सरपंच मनिषा ढेंगळ, तुळाना, पोलिस पाटील ढेंगळे, गावातील बंधू बघिणी व शेतकऱ्याची प्रामुख्याने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!