व्याघ्र प्रेमी करिता ताडोबा बफर सुरू



चंद्रपुर :-
प्रितम साखरकर
(प्रतिनिधी)

जगभरातील व्याघ्र प्रेमीची पहिली पसंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मधील बफर क्षेत्रातील पर्यटन दिंनाक 1जुलै 2020 बुधवार पासून सुरू करण्यात आले 105 दिवसा नंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा सुरू करण्यात आले
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या मध्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मध्ये वाघ आणि वन्यजीवांचे चांगले वास्तव्य आहे आणि देवाडा, अगरझरी, जुनोना (मोहुर्ली रेंज), मामला (चंद्रपूर), पांगडी, झरी, डोणी (कोलसा ), कोलारा, सिरकाडा, मदनापूर आणि अलिझंझा येथे 13 गेट आहेत. कोलारा (रेंज), नवेगाव आणि रामदेगी (निमढेला) खडसंगीच्या दिशेने आहे.

5 जून रोजी पर्यटन सुरू करण्यासाठी नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने (एन.टी.सी.ए) पुढाकार दिल्यानंतर, पी.सी. सी.एफ. (वन्यजीव) ने , ताडोबाच्या कोर क्षेत्रा मध्ये पर्यटन सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चे वनसंरक्षक (सी एफ) फील्ड डायरेक्टर एन.आर. प्रवीण यांनी “ 13 गेटचे रस्ते उघडलेले आहेत. प्रवेश ऑफ लाइन असून आगाऊ बुकिंग होणार नाही. " प्रवेश शुल्क १,००० ठेवण्यात आले आहे तर जिप्सी शुल्क २,२०० रुपये आणि मार्गदर्शक फी 350 रुपये आहे.
प्रत्येक गेट वरून 30- 40 कि.मी पर्यटन मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्येक गेट मधून किमान 12 वाहने (दोन शिफ्ट मध्ये प्रत्येकी सहा) परवानगी आहे.
येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेण्यासाठी वन विभाग जिप्सी, ड्रायव्हर व गाईड यांना सानेटाईज करून जंगलात प्रवेश दिले जात आहे व पर्यटक, गाईड व ड्राइवर यांना मास्क लावून व अन्य खबरदारी घेण्याची सक्त सूचना दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!