तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे १० वर्षीय मुलाचा शहरालगत असलेल्या बोळीत पडून मृत्यू
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.०८/०७/२०२० ला चिमूर शहरातील वडाळा पैकू येथील पिसे पेट्रोल पंम्प च्या मागील रामदासजी अगडे यांच्या शेतातील बोडीमध्ये ५ लहान मूले पोहायला गेली असता ११ वर्षीय सोहेल गिरीधर चौधरी या लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला असून या मुलाला शव विच्छेदन करण्याकरिता उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. चौधरी परिवाराला या दुघद घटनेने मोठा धक्का पोहचला असून ४ जणांचा छोटा कुटुंब होता. त्यात आई वडील आणि २ मुले अशा छोट्या कुटुंबावर पहाड कोसळले असून या घटनेचे तपास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक गायकवाड , पो.शि.विनायक सरकुंडे , पो.शि.विलास निमगडे , पो.शि. सुशील आठवले , पो.शि.गजभे , चा.ना.पो.शि.कैलास वनकर करीत आहे.
अशा प्रकारचे शेततलाव म्हणून शासनाच्या डोळ्यात धूळ झोकुन मुरूम व माती उपसा करणारे अवैध ठेकेदार शासकिय परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर माती,मुरूम यासारख्या अवाढव्य गौन खनिज उत्खननामुळे दरवर्षी लहान मुले घरच्यांना न सांगता पोहण्यासाठी घराबाहेर पडत असतात यामुळे शेततलावामध्ये व खड्यामध्ये पाण्याचा अंदाज व्यक्त करू शकत नसल्याने लहान मुलांचा बुडून मृत्यू होत आहे.यास जवाबर परिपूर्ण शासकिय यंत्रणा असून याकडे दुर्लक्ष का असा ? जनतेसमोर उपस्थित झाला आहे.या घटनेमुळे चिमूर शहरातील वडाळा पैकू येथे शोककळेचे वातावरण निर्माण झाले आहे.तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे १० वर्षीय मुलाचा शहरालगत असलेल्या बोळीत पडून मृत्यू



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!