मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील युवक पॉझिटिव
चंद्रपूर(दि-8 जुलै):-जिल्ह्यात आज बुधवारी एकूण ६ बाधित पुढे आले आहे.सायंकाळी मूल तालुक्यातील एक युवक पॉझिटीव्ह आल्यामुळे दुपारपर्यंत पाच असणारी संख्या सहा झाली आहे.
मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील २५ वर्षाचा एक युवक कोरोना रूग्ण म्हणुन निष्पन्न झाले. येथील कर्मवीर महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या संस्थात्मक विलीगीकरण गृहात सदर युवक मागील पाच दिवसापासुन देखरेखीत होता. सदर युवक हैद्राबाद येथुन आल्यापासुन मूल येथेच होता. त्याचा गांवाशी कोणताही संपर्क आलेला नव्हता, असे बोलल्या जात आहे. प्रशासकीय यंञणे कडून कार्यवाहीला सुरूवात.
यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधितांची संख्या एकूण १३० झाली असून यामध्ये चंद्रपूर येथे चाचणीत पॉझिटीव्ह निदान झालेले ४ राज्य राखीव दलाचे जवान आहे. त्यामुळे फक्त चंद्रपूर येथील बाधितांची संख्या जरी १३० झाली असली तरी एकूण जिल्हयातील बाधित १३४ झाले आहेत .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!