आलेवाही चा काशीपूर तलाव फुटण्याची भीती

हजारो लोकांच्या जीवीताला धोका, तलाव फुटन्याच्या परिस्थितीत
नागभीड तालुक्यातील आलेवाही येथील काशितलावाला "छिद्र" तुरुंबावर पाणी आल्याने पाण्याचा अपव्यय, सिंचाई विभागाची अनास्था कारणीभुत.


नागभीड (यश कायरकर)
आलेवाही येथील मालगुजारी तलाव असलेल्या "काशितलावास" तुरुंबाजवळ मागील दोन वर्षा पासुन छिद्र असल्याने तलावाचे पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी स्थानिक शेतकर्याकडुन वारंवार सुचना देऊनही त्यावर सिंचाई विभाग ऊपाययोजना करीत नसल्याने विनाकारण पाणी वाया जात आहे. यासाठी सबंधीत सिंचाई विभागाची अनास्था कारणीभुत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडुन होत आहे.
नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आलेवाही येथे माजी मालगुजारी "काशीतलाव "आहे. या तलावावर जवळपास 2000 एकर शेतजमीन अवलंबुन आहे. परंतु मागील दोन वर्षापासुन गेट क्र.2 चे जवळ तलावाला छिद्र असल्यामुळे तलावातील पाणी विनाकारण वाया जात आहे. वारंवार सुचना, तक्रारी करुनही त्यावर कोणतीही ऊपाययोजना केल्या गेली नाही. सदर तलाव घोडाझरी ऊपविभाग सिंचाई शाखा सिंदेवाही अंतर्गत येत असुन  या विभागाची अनास्था कारणीभुत असल्याची प्रतीक्रीया शेतकर्याकडुन होत असुन यामुळे संचीत पाणी वाया जात आहे. दोन दिवसापुर्वी  समाधानकारक दमदार पावसाने सुरवात केल्याने  तुरुंबावर 5 फुट पाणी आला आहे  तुरुंबाचे गेट बंद असुनही  असलेल्या छिद्रातुन  पाण्याचा अपव्यय होत आहे. असेच एकसारखे सुरु राहील्यास व तलाव पुर्ण भरल्यास  छिद्राचे "भगदाडात" रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. आणि या वेळेस तलावातील सर्व पाणी वाया जाईल  यात शेतीचे  व शेतकर्यांचे अतोनात  नुकसान होईल. यात शेतकर्यांचे मशागत केलेली शेत वाया जाईल  खुप मोठा धोका होऊ शकतो     काशितलाव  परीसरात एकमेव मोठा तलाव असल्याने यात मच्छी पालन मोठ्या प्रमाणात होत असतो  यावर परीसरातील शेकडो ढीवर समाज अवलंबुन आहे. याला सर्व जबाबदार  सबंधीत विभाग राहील का?  असा प्रश्न शेतकरी प्रशासनाला करीत आहेत. यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे.              काशितलाव हा आलेवाही साठी "वरदान" आहे  या तलावावरच  वाढोणा, आलेवाही, जीवनापुर, आवळगाव सह परीसरातील शेतकर्यांसोबतच शेतमजुराची ऊपजीवीका  या तलावावर आहे  घोडाझरी नंतर नागभीड तालुक्यात काशितलाव एकमेव तलाव आहे. यावरच मच्छीमारी करणार्या ढीवर समाजाची ऊपजीवीका आहे  त्यामुळे शासनाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!