चंद्रपुर वन विभागाकडून शेतकऱ्यांनवर होणारा नाहक त्रास सहन केला जाणार नाही - रामपाल सिंग जिल्हा महामंत्री भाजपा जिल्हा चंद्रपूर




चंद्रपुर :-
प्रितम साखरकर


चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बफर झोन मधील वलनी, बोर्डा, घंटा चौकी येथील शेकडो वर्षां पासून अनु सूचित जमातीचे शेतकरी वडिलो पार्जित शेती करीत आहे. त्याचे जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी ते जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना शेती करीत असताना रोखण्याचा वर शेती उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच त्यांना मार झोड करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे. त्या संदर्भात मा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पाहणी करण्याकरिता मा.रामपाल सिंग जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर यांनी दि. 7 जुुलैै रोजी सकाळच्या सुुुमारास शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी वन विभागाकडून आपल्यावर होत असलेले अन्याया विषयी माहिती दिली. यावेळेस भाजपा जिल्हा महामंत्री रामपाल सिंग म्हणाले वन विभागाकडून शेतकऱ्यांनवर होणारा नाहक त्रास सहन केला जाणार नाही. या वेळेस त्यांच्या सोबत गौतम निमगडे जि.प.सदस्य चंद्रपूर, मा दयानंद बंकूवाले, दिपक खनके सरपंच बोर्डा यांची उपस्थिती होती..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!