लाॅकडाऊनच्या काळातील परिस्थिती

लाॅकडाऊनच्या काळातील परिस्थिती

    जगभरात ही कोरोना महामारी आली आणि सारं नुरच पलटलं. जणु हा जगच थांबल्यासारखा झाला. सगळे व्यवहार बंद, रेल्वे बंद, प्रवास बंद. जिकडे तिकडे भितीचे वातावरण.  शहरातील गर्दी थांबली, ट्राफीक थांबली. सगळीकडे शांततेचे वातावरण. त्यामुळे ध्वनी प्रदुषण, वायु प्रदुषण कमी तर झालं पण सगळं जग थांबल्यासारखे झाले. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर तर परिणाम पडलाच पण लोकांचा रोजगारही गेला. ग्रामीण भागाातील लोकांचा रोजगार गेला.  व्यावसायिक किरकोळ दुकाने बंद पडली. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. रोज त्याच त्या बातम्या टिव्हीवर, वृत्तपत्रात आल्या, कोरोनाचे रूग्ण वाढले, तर काहीचा मृत्यू झाला. तेच ते ऐकून लोकांमध्ये भीती निर्माण झाली. अशातच या लाॅकडाऊनचा काळात ग्रामीण भागातील लोकांची तर फारच दशा झाली. लोकांची मजुरी गेली. या कोरोनाचा संकटाने सरकारनी लाॅकडाऊन तर केले. त्यामुळे बससेवा बंद झाली, खाजगी वाहने बंद झाले,  कपड्याचे दुकाने बंद झाली. गावातील मजुर शहरात कामे करण्यासाठी जायचे तर तेही बंद झाले. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला. सरकारनी गावातील व शहरातील गरीब जनतेसाठी महिन्याचे 500 रूपये खात्यात जमा केले. पण तेही त्यांचे जनधन खाते असेल त्यांचेच. जनधन खाते काहीच लोकांचे असल्याने त्यांनाच ते पैसे मिळाले. व इतर लोकांना काहीच मिळालं नाही. लाॅकडाऊन वाढतच चालला असल्याने लोकांचे रोजगारच बंद पडले. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपासमारीची वेळ आली. अषातच सरकारनी वीजबील माफ करू असे सांगितले होते, तेही नाही केले आणि अचानक 3 महिन्याचे भरमसाठ बील पाठविले. गावातील लोक आपले पोट भरतील का ? बील भरतील ? लोकांना खायचे वांदे निर्माण झाले, तर ते वीजबील तरी कसे भरतील.
या महामारीमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये एक वेगळाच बदल झाला. गावातील पुरूष मंडळी निटनेटके राहायला लागले. दररोज अंघोळ करणे, कोणते काम केल्यावर स्वच्छ हात पाय धुणे. कपडे दररोज धुवायला टाकणे. त्यांचे राहणीमान बदलले. नीटनेटके राहणे, स्वच्छ कपडे घालणे, त्यामुळे इतर  रोगापासून बचाव करू लागले. कोरोना व्यतिरिक्त इतर आजार कमी दिसू लागले. नाहीतर सर्दी, ताप, पोटदुखीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीण रूग्णालयात दिसून यायचे पण तेही कमी झाले. ग्रामीण रूग्णालयात पेंशटची संख्या कमी झाली. आणि या लाॅकडाऊनच्या काळात दारूचे दुकाने बंद असल्याने गावात शांततेचे वातावरण दिसून आले. नाहीतर दारू पिऊन लोकांचे झगडे होत होते, पण कोणतेच तंटे दिसत नव्हते. आणि गावात लोक दारू पिऊन पडून दिसायचे. पण तेही नव्हते, यामुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा कमी झाले. दरवर्षी कितीतरी लोक अपघाताने मरण पावत होती, पण या लाॅकडाऊनच्या काळात अपघाताचे प्रमाण कमी झाले.
शहरी भागातील मुलं-मुली आपल्या परिवारासोबत एकत्र राहू लागले. त्यांच्या आई-वडिलांना मुलांसोबत वेळ मिळाला. घरी वेळ देऊ लागले. त्यामुळे आपुलकी वाढली. रोज नवनवीन पदार्थ बनवून आई आपल्या मुलांना द्यायची. वडिल आपल्या लहान मुलांसोबत घरीच खेळत होतेे. सगळं परिवार एकत्र राहायचे. नाहीतर अगोदर सगळे आपल्या कामात व्यस्त राहायचे. कुणाला वेळ मिळत नव्हती बोलायला. मोबााईलवरच व्यस्त असायचे. पण या लाॅकडाऊच्या काळात खूपच परिवर्तन घडून आला. घरीच राहल्याने आई-वडिल आपल्या मुलांसोबत वेळ घालवू लागले. परिवार एकत्र आला. या कोरोना महामारीने लोकांना खूप काही शिकविले. 

राणी भोयर, मारोडा
China pathogen respiratory coronavirus 2019-ncov flu outbreak 3D medical illustration. Microscopic view of floating influenza virus cells. Dangerous asian ncov corona virus, SARS pandemic risk concept     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!