बाहेर जिल्ह्यातिल व्यापारी व एजंट ना भिसीत येण्यास पायबंद घाला



भिसी व्यापारी असोसिएशन ची मागणी

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - कोरोणा वायरस चे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. चिमूर तालूक्यात कोरोणा पॉजेटिव्ह एक पेशंट मिळाल्याने खळबळ माजली होती. त्या अनुशंगाने चिमूर व्यापारी असोशिएशन ने चिमूर व्यापार पेठ तिन दिवसांसाठी बंद ठेवली आहे. तसेच चिमूर शहर तिन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला. या निर्णयाचे भिसी व्यापारी असोशिएशन ने स्वागत केले आहे. तसेच भिसी व्यापारी असो. च्या काही व्यापारी बांधवांच्या तक्रारीनुसार चंद्रपूर जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या " होलसेल व्यापारी व एजंट" ना आपल्या गावात येण्यापासून "मनाई" करण्यात येत आहे. भिसी व्यापारी असोशिएशन ने सदर निर्णय कोरोणा संक्रमण च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला आहे.

भिसी येथील सर्व व्यापारी बांधवांनी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या आपआपल्या "होलसेल व्यापारी व एजंट" स्वतः फोन करून " गावात न येण्याची" माहीती द्यावा अशी सुचना मंडळातर्फे सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.सुचना दिल्यानंतरही जर बाहेरून आलेला व्यापारी आढळल्यास त्याला १४ दिवस कॉरंटाईन केल्या जाईल.


बाहेर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना गावात येण्यास पायबंद घालण्यात यावा या आशयाचे निवेदन भिसी व्यापारी असो. तर्फे भिसी पोलीस ठाणे, ग्राम पंचायत कार्यालय व भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्र इथे देण्यात आले.यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष पंकज मिश्रा, उपाध्यक्ष अनिल रेवतकर, उपाध्यक्ष विनोद खवसे,सहसचीव सुरेन्द्र घरत, पंकज गाडीवार,रामु जाजू, मेश्राम आदी व्यापारी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!