मोहर्ली येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी दिन साजरा
प्रितम साखरकर (प्रतिनिधी).
दिं 7 जुलै मंगळवार रोजी चंद्रपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या मोहूर्ली गावाच्या ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी दिन आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात धाना वरील कीड व रोगांचे व्यवस्थापन यावर गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात संजय मोंढे (ग्रामपंचायत मोहर्ली) रामकृष्ण साखरकर (पोलीस पाटील मोहर्ली) प्रदीप वहाने (तालुका कृषी अधिकारी चंद्रपूर) वाय के वेस्कडे (ग्रामसेवक मोहर्ली) रोशन दुर्गे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!