विवेकानंद विद्यालय खांबाडा येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सपत्नीक सत्कार
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - नेरी,येथून अगदी जवळ असलेल्या विवेकानंद विद्यालय खांबाडा येथे आज दिनांक ३० जुन ला शाळेतील मुख्याध्यापक एन.एस. भोयर हे वयाची ५८ वर्षे पुर्ण करुन सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्त सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन ध्यान संवर्धन शिक्षण संस्था नेरी तर्फे करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष क.ना. लोनकरअध्यक्ष ध्यान संवर्धन शिक्षण संस्था नेरी , तर प्रमुख अतिथी प्रा.राम राऊत सर वी ना रणदिवे सर, वी.डी.आष्टनकर सर ,अ.स.वाघे सर,प.स.राऊत सर, सौ उज्ज्वला एन भोयर मैडम वी.के. वैरागड़े मुख्याध्यापक विवेकानद विद्यालय तसेच सत्कारमुर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन एस भोयर सर आणि सौ.उज्ज्वला एन भोयर आणि सर्व संचालक मंडळ ऊपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तथा स्वामी विवेकानंद तसेच सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन करण्यात आली. यावेळी प्रस्तावना मुख्याध्यापक वी.के वैरागड़े सर यानी केली , माजी प्राचार्य राम राऊत सर ,रणदिवे सर आष्टनकर सर प स राउत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरील मान्यवरानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन एस भोयर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.त्यांचे ऊर्वरीत आयुष्य सुख ,समाधान आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
मान्यवरांच्या हस्ते एन एस भोयर सर यांचा सपत्नीक शाल ,श्रीफळ आणि कपड़े भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला ऊत्तर देतांना एन एस भोयर सर यांनी मि संस्थेचा अत्यंत ऋणी आहे.संंस्थेणी तसेच सहकार्यांनी मला प्रेम ,आपुलकी व स्नेहाची वागणूक दिली. या ऋणामधुन ऊतराई होणे शक्य नाही असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन सौ के व्ही आष्टंकर मैडम ,प्रास्तविक वी के वैरागड़े तर आभारप्रदर्शन जी एम दडमल यांनी केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!