कृषी संजीवनी सप्ताह साजरा



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगांव (पिपर्डा ) : - कृषि संजीवनी सप्ताह आणि महानायक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस यानिमित्त महाराष्ट्र शासनाने दि.१ ते ७ जुलै या दिवसांत कृषि संजीवनी सप्ताह राबवण्याचे ठरविले आहे. आज कृषि सहायक एन.आर. मोरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहे. गावात शेतकरी सभा आयोजित केली. या सभेमध्ये पळसगांव साजाचे कृषी सहाय्यक एन.आर.मोरे, सरपंच गीता शेंडे, प्रगतशील शेतकरी गोकूळ सोनेकर पिपर्डा, उद्धव गुरनुले,सुधीर जुमडे,भक्तदास कोहचाडे,विकास ,संजीव वाघरे,एजाज शेख,  कृषी मित्र पांडुरंग सगळामे आणि गावकरी उपस्थित होते.यावेळी कृषी सहाय्यक एन आर मोरे यांनी श्री "पद्धतीने धान रोवणी , निंबोळीचे महत्त्व, पट्टा पध्दतीने रोवणी, पिक विमा योजना, गोपिनाथ मुंढे अपघात योजना व कृषी विभागाच्या विविध योजनांविषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना पिकांतील कीड व्यवस्थापन बद्दल माहिती दिली यानंतर प्रगतशील शेतकरी उद्धव गुरनुले यांचा शेतात जाऊन भात या पिकांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यात सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन कृषी सहायक एन.आर.मोरे या वेळी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!