मूल हादरले… पुन्हा एकाच दिवशी १३ पॉझिटिव्ह
मूल हादरले… पुन्हा एकाच दिवशी १३ पॉझिटिव्ह
मूल (प्रतिनिधी)
मूल शहरात कोरोणाचा
कहर कायम असून, बाहेर राज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजूरांपैकी आणखी १२ मजूरांसह मूल
शहरातील आणखी एकाचा कोरोणा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
आल्यांने, शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विश्वसनीय सुत्रानी
दिलेल्या माहीतीनुसार, यापूर्वी आढळून आलेल्या १३ मजूरांसोबतच आलेल्यापैकीचे काहीचे
अहवाल आज तालुका आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले. त्यात, १३ मजूरांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून, कर्मवीर
महाविदयातील कॉरन्टाईन सेंटर मध्ये असलेल्या एका युवकांचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला
आहे.
हा युवक कॉरन्टाईनमध्ये
असला तरी, त्याचे पालक त्याला भेटायला जात असल्यांने, त्यांचे पालकांची स्वॅब तपासणी
होणार असल्यांचे विश्वसनीय सुत्रानी आमचे प्रतिनिधीस माहिती दिली.
काल एका राईस मिल मध्ये एक मजूर आणि हैदराबाद वरून आलेली एक महिला पॉझिटिव्ह निघाली होती.
आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान तालुका प्रशासनाने सर्व कोरोनाग्रस्तांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले आहे.
आधी अतिशय सेफ मध्ये
असलेले मूल शहरात अचानक कोरोणाचा कहर झाल्यांने, मूल शहर हादरून गेले आहे. व्हाट्सअप आणि इतर सोशल मिडीयावर वेगवेगळया प्रतिक्रिया
उमटत आहे. नागरीक आपले म्हणणे मांडत आहेत. याबाबत मूलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर
यांनीही मूल शहरातील जनतेला आवाहन करणारे पोष्ट सोशल मिडीयावर वायरल केले आहे.
काय आहे नगराध्यक्षांचे
आवाहन?
नम्र आवाहन
सर्व मूलवासीय जनतेला विनम्र आवाहन करण्यात येते की मूल शहरात पर राज्यातून आणलेल्या मजुरांपैकी बरेच बाधीत रूग्ण मिळाल्याने साहजिक आहे की, स्थानिक लोकांना राग येणे व तो राग व्यक्त करणे. पण एवढा सारा मजूरवर्ग आणतांना मूल शहरातील विलगिकरण कक्षाची क्षमता तपासली का? मजूर आणत असतांना स्थानिक स्वराज्य संस्था यांना ही माहिती दिली का? हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.आता कुठे माझ्या मूल शहराने स्वतःला भितीतून सावरले होते, पण ह्या दोन दिवसात बाहेरील मजूराच्यासह कोरोणाने शिरकाव केला. आणी परत एकदा मूलवासीय माझ्या बंधूभगीनींना भीतीचा सामना करावा लागतो आहे.पण माझ्या बंधू आणी भगनिंनो आपल्या आरोग्यासाठी नगरप्रशासन, तहसिल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग योग्य काळजी घेत आहे तरी आपन सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद प्रा.रत्नमाला भोयर, नगराध्यक्षा न.प.मूलस्थलांतरित मजुरांना संस्थात्मक विलगीकरण करा- आम आदमी पार्टीची मागणी




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!