श्रावणावर आले कोरोणाचे संकट

श्रावण महिन्यात धार्मिक सणांवर आले कोरोनाचे सावट
प्रथा,परंपरेला खंड : अनेकांच्या आनंदावर पडले विरजण


मूल (प्रमोद मशाखेत्री) :-

श्रावण मास वर्षातील एक महत्वपूर्ण महिना समजला जातो. सण मोठया उत्साहाने साजेर केले जातात. पण कोरोनाचे संकट कायम असल्याने श्रावण मासात येणार्‍या धार्मिक सणावर मात्र, विरजन पडले आहे.
मंगळवार पासून श्रावण महिन्याला सुरूवात होत असून 18 आँगस्टला संपणार आहे. या कालावधीत 25 रोजी नागपंचमी, 3 रोजीला रक्षाबंधन, 12 रोजी गोपाल काला, 18 रोजी पोळा सण आहे. यातच स्वातंत्र दिनाचाही समावेश आहे.
या महिन्यात चार श्रावण सोमवार येत असून हा महिना धार्मिकतेचा मानला जातो. नागपंचमीच्या पर्वावर या भागातील भाविक नागव्दार येथे तर रक्षाबंधनाला पचमढी येथे जातात. पण कोरोनामुळे जिल्हा बंदी असल्याने जिल्हयाच्या बाहेर जाणे शक्य नसल्याने दरवर्षी नागव्दारची वारी करणार्‍यांच्या वारीत खंड पडणार आहे.
मंदिराचे दरवाजे बंद असल्याने श्रावण सोमवारी मात्र मंदिराच्या पायरीवर किंवा घरातील देव्हार्‍यातच पूजा करावी लागणार आहे.
महिन्याच्या अखेरीस शेतकरी बंधवाचा पेाळा हा महत्वपूर्ण सण येत असल्याने शेतकरी या सणाची महिनाभरा पूर्वीपासूनच तयारी करतात. या सणाला वेगळे महत्व आहे.मात्र यावेळी पोळा भरणार की, नाही ही शंक असल्याने अनेकाचा हिरमेाड झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!