काम घरकुल विभागाचे आणि खापर संगणक परीचालकाचा माथी
सावरी ग्राम पंचायत चा अजब प्रकार
गावातील अंतर्गत राजकारणात बळी घेतल्या जात आहे सामान्य संगणक परिचालकाचा
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : -
तालुक्यातील सावरी ग्राम पंचायत मधील अजब प्रकार ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रपत्र-ड अंतर्गत कुटुंबांचे आवास प्लस या ऑनलाईन आप मध्ये माहिती भरने चे काम आपले सरकार सेवा केंद्राच्या कार्यकक्षेत येत नसतानाही या केंद्राच्या संगणक परिचालकांच्या माथी ते काम मारले गेल्या होते.ग्राम विकास विभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना तशी परवानगी न घेता तालुका वरून या कामासाठी संगणक परिचालकांना सक्ती करण्यात आली होती.जबरदस्ती हे काम आपले सरकार सेवा केंद्र परिचालकाला देण्यात आले होते. त्यामुळे सावरी येथील संगणक परिचालकांने पंचायत समिती मधून मिळालेल्या यादी नुसार काम केले मात्र त्या वेळेस नेटवर्क चा प्राब्लेम आणि काही तांत्रीक बाबीमुळे गावातील काही कुटुंबाचा डाटा सदर ऑनलाईन प्रणाली मध्ये अपलोड झाला नाही . याची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची आहे . तरी सावरी बीड येथील प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी बिगर शासकीय व कंपनी कडून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आपले सरकार केंद्र परिचालकावर याचे खापर फोडण्यात येत असून, गावातील काही संधी साधू राजकारणी लोकांच्या दबावामुळे व संबंधित यंत्रणा व शासकीय अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी विनाकारण नऊ वर्षी परिचालक पदावर काम केलेल्या सुरेश मेश्राम या परिचालकावर एक तर्फी कारवाही करण्यात येत आहे. नाहक बदनाम करून त्यांना कामावरून काढण्याचा बेत आखला जात आहे, मात्र सदर काम घरकुल विभागच्या कार्य क्षेत्र येत असून त्यांना मात्र यातुन सूट दिल्या जात आहे . परिचालकांनी काम केले की नाही केले व का नाही झाले. तर ते पूर्ण करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक व संबंधित यंत्रणेचे असताना ग्राम सेवक व संबंधित यंत्रणा मात्र यातून मी कशी सूटेल असा विचार करून दोष परिचकाचा माथी मारले जात आहे, यात एक तर्फी निर्णय घेतल्या जात असल्यामुळे संगणक परिचकाचा मनात सदर विषयावर असंतोष पसरला आहे. सदर परिचकाचा कुठलाही दोष नसताना विनाकारण कामावरून काढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सदर परिचकाचा दोष नसताना तालुका व्यवस्थापक मात्र यात लक्ष देण्यास धजावत नाही. तेव्हा असा प्रकार केल्यास कोरोनाच्या काळात परिचालक रस्तावर आल्याशिवाय राहणार नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!