मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली

ब्रेकिंग
मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली


मूल (प्रतिनिधी)
मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बल्लारपूर नगरपालिकेत बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर जिल्ह्यातील मोवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम हे पदभार सांभाळणार आहेत.
बल्लारपूर चे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची जागेवर विजयकुमार सरनाईक हे बल्हारपूर चे नवे मुख्याधिकारी म्हणून काम पाहतील.
विजयकुमार सरनाईक मूल नगर परिषदेमध्ये लोकप्रिय मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे चार वर्षाच्या कार्यकाळात मूल नगर परिषदेत अनेक विकासात्मक प्रकल्प पूर्णत्वास आले. शहरातील अनेक घटकांसोबत त्यांचा जवळचा संबंध होता आणि लोकांच्या मागणीला सक्रीय प्रतिक्रिया देत असल्याने ते चांगलेच लोकप्रिय सुद्धा झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!