दारिद्रयरेषेखाली व लघु उद्योजकाचे सरसकट विज बिल माफ करा: मंगेश पोटवार
दारिद्रयरेषेखाली व लघु उद्योजकाचे सरसकट विज बिल माफ करा: मंगेश पोटवार
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन
मूल: चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर दारीद्ररेषेखालील नागरीक आणि लघु उघोजक कायम स्वरूपी वास्तव्य करीत राहत आहे, मागील 3 महिण्यापासुन देशात टाळेबंदी असल्यामुळे नागरीकांना घराबाहेर अथवा आपले व्यवसाय सुरू करता आले नाही, यामुळे नागरीक अडचणी सापडले आहे. परंतु विज वितरण कंपनीने मागील 3 महिण्याचे विज बिल एकावेळेस पाठविल्याने दारिद्रयरेषेखाली व लघु उद्योजकांना बिल भरणे कठीण झाले आहे, त्यामुळे सरसकट विज बिल माफ करावे अषी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार यांनी राज्याचे उर्जा, नगरविकास, आणि आदीवासी विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हा औघोगिक दृष्टया संपन्न आहे, जिल्हयात मोठया प्रमाणावर कारखाने असल्यामुळे मजुरांची सख्याही मोठया प्रमाणावर आहे, मजुर लोक दिवस-रात्रौ कारखान्यामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करीत आहे, मात्र मार्च महिण्यात देशासह राज्यातही टोळबंदी लागु केल्यामुळे मजुरांचा रोजगार हिरावण्यात आला तर जे बेरोजगार बॅंकेतुन कर्ज काढुन लहान सहान व्यवसाय करीत आहे त्यांनाही याटाळेबंदीमुळे बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे, असे असतांना विज वितरण कंपनीने माहे मार्च, एप्रिल आणि मे महिण्याचे विज बिल सरसकट पाठविलेे आहे.
मजुरांना जिवनजगण्यासाठी काटकसर करावी लागत आहे, मुलाबाळाच्या आरोग्यसह, शिक्षण घेण्यासाठी आधीच पैस्यांची जुळवाजुळव करावे लागत आहे, लघु उद्योजकांना बॅंकेची किस्त भरण्यासाठी पैसे नाही अशास्थितीत विज बिल भरावे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे, दारिद्रयरेषेखालील नागरीकांना शासनाने जिवन जगण्यासाठी जिवनात्यक साहित्य वाटप करीत आहे, मात्र जिवन जगण्यासाठी केवळ साहित्य वाटप करून जिवन जगता येत नाही, त्यासोबतच आता विज वितरण कंपनीने मागील 3 महिण्याचे विज बिल सरसकट पाठविले त्यामुळे दारिद्ररेषेखाली नागरीक, कामगार आणि लघु उद्योजक व्दिदामनस्थितीत आहे, यामुळे शासनाने तात्काळ विज बिल सरसकट माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार यांनी राज्याचे उर्जा, नगरविकास, आणि आदीवासी विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!