वीर भगतसिंग संघ राजुरा तर्फे २०० युनिट विद्युत बिल माफ करण्यात यावा या करीता तहसीलदारांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - संपूर्ण भारतात कोरोना कोविड - १९ या रोगाची महामारी सुरु असून लॉकडाऊन मध्ये विद्युत मंडळाने पाठवलेल्या भरमसाठ विद्युत बिलाच्या २०० युनिट मध्ये कपात करण्यात यावी याचे कारण म्हणजे विद्युत बिल महावितरण कंपनी यांनी जनतेवर लादलेली हि मनमानी आहे . ३ महिन्याचा सरसकट विद्युत बिल ग्राहकांना पाठविले असून जनतेच्या हाताला काम नाही.कारखाने बंद पडली आहे.रोजगार नाही आणि एकिकडे शासन ३ महिन्याचे राशन मोफत देऊन आनंद देत आहे.तर दुसरीकडे भरमसाठ विद्युत बिलावर बळजबरीने ग्राहकांना रडविण्याचे काम करीत आहे. हे लक्षात घेऊन वीर भगतसिंग संघ आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार तहसील कार्यालय राजुरा यांना निवेदन दिले.
आणि प्रत्येक महिन्यातील २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे अशी शिफारस केली. तसेच शेतकऱ्यांनी या वेळेस केलेल्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांचे सोयाबीन वापले नाही याचे कारण म्हणजे कंपनीने पाठवलेले बोगस बियाणे होय यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्या बोगस कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस केली आणि सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी अशिही शिफारस केली.यावेळी स्वप्निल कोहपरे वीर भगतसिंग संघ अध्यक्ष , रोशन येवले सत्यशोधक शेतकरी सभा जिल्हाध्यक्ष , विजय कामेपलीवार महासचिव संघ , प्रदीप भोबळे सामाजिक कार्यकर्ते , संदेश वडस्कर वीर भगतसिंग तालुका सचिव , सुमित कोहपरे जिल्हा संघटक , मारुती कोतापलीवार व आदी उपस्थित होते.आणि तसेच ज्यांनी जनतेपर्यंत जाऊन एक हजार लोकांच्या सह्या घेण्यास मदत केली.परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही असे कार्यकर्ते शिव पिंपळशेंडे मुक्काम खामोना तसेच आशिष मोरे खामोना मारुती वाढयी प्रदीप मडावी व प्रदीप जानवे चंदनवाही प्रशांत आईलवार आर्वी रितिक येवले खेरगुडा यांचे सुद्धा खूप खूप आभार यावेळी वीर भगत सिंग संघ राजुरा यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!