वाघाने घेतला शेतघरात आश्रय
घरात घेतला वाघाने आश्रय
नागभीड (यश कायरकर)
बाम्हणी गावातील झोपडीत वाघाचा मुक्काम...
नागभीड पासून 10 किलोमीटर लांब असलेल्या बाम्हणी गावात आज दुपारी 3 वाजता पट्टेदार वाघाने शिरकाव केला व श्रीकांत देशमुख यांच्या गावाला लागून असल्या शेतातील झोपडीत वाघाने शिरकाव केला व झोपडीला लागून असलेल्या घराजवळील मनोहर पाल (60) या इसमावर हल्ला करून गंभीर जखमी केले... सदर वाघाने काल सुद्धा दोन वासरांना ठार मारले... वृत्त लिहस्तोवर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड आपल्या संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले तसेच झेप निसर्ग मित्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित झाले होते वृत्त लिहिपर्यंत वाघ झोपडीतच ठाण मांडून बसला होता. मात्र वनविभाग आपले शर्थीचे प्रयत्न करीत होता. सायंकाळपर्यंत एस.टी.पी.एफ. ची टिम मोक्यावर पोचली. रात्री उशिरा पर्यंत वयस्कर वाघिनीला ट्राँकुलाईज करून नेन्यात आले.






i
उत्तर द्याहटवानागभीड तालुकातील गोविंदपूर येथे पोलीस ठाण्याचे आशीर्वाद दिला आहे या मुळे दारूचा गलोगली खुलेआम महापूर सुरु आहे. दारू विक्रीवाले गावातील कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला न जुमानता , उरमठ पाने वर्तन करतात. याला कोनी लगाव लावील का ❓. नविन पिढी यामुळे जास्तच दारूच्या आहारी जात आहे.
हटवा